Tuesday, September 8, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तनिवडणुकीदरम्यान रात्रंदिवस काम करणारे कार्यकर्ते वाऱ्यावर.. - अनेकांच्या हाती काम तर...

निवडणुकीदरम्यान रात्रंदिवस काम करणारे कार्यकर्ते वाऱ्यावर.. – अनेकांच्या हाती काम तर काम न मिळालेल्यांची चिंता वाढली…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या.विजयी उमेदवार सध्या मुंबईत तळ ठोकून आहेत,तर पराभूत उमेदवार आपापल्या कामाला लागले आहेत.दोन्ही उमेदवारांकडे निवडणुकीदरम्यान रात्रंदिवस काम करणारे कार्यकर्ते मात्र सध्या वाऱ्यावर असून,जिंकलेले कार्यकर्ते सध्या खुशीत असून हारलेल्या नेत्यांचे कार्यकर्त्यांनी आता रोजगारासाठी शोधाशोध सुरू केली आहे.कार्यकर्ते कामाच्या शोधात फिरत असल्याने महिनाभर गजबजलेले चौक आता ओस पडू लागले आहेत. महिनाभर विविध पक्षांचे झेंडे घेऊन कार्यकर्ते साऱ्या मतदारसंघात रात्रंदिवस फिरले.आपल्या उमेदवारांचा जयजयकार केला. सकाळी उठून प्रचार फेऱ्या आणि पदयात्रांसाठी सज्ज राहणारे कार्यकर्ते निवडणूक संपताच रिकामे झाले आहेत.
निवडून आलेले उमेदवार व पराभूत झालेल्या उमेदवारांनी धाकधूक संपल्याने आता त्यांनी काम संपताच झेंडे घेऊन फिरणाऱ्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले आहे.निवडणुकीच्या कालावधीत सलग महिनाभर चहा नाश्ता ते जेवण व सायंकाळी दिवसभराचे मानधन व अन्य सुविधा उपलब्ध असल्याने या कार्यकर्त्यांना महिनाभर कामाची गरज पडली नाही.निवडणूक संपली आणि या कार्यकर्त्यांची गरजही संपली.त्यामुळे त्यांना काम शोधण्याशिवाय पर्याय राहिला नाही.
गजबजलेल्या चौकात महिनाभर विविध पक्षांचे कार्यकर्ते चौकाचौकांत एकत्र येऊन पुढील नियोजन करत होते.त्याचबरोबर रात्री प्रचार संपल्यानंतर दिवसभराच्या कामांचीही चर्चा चौकाचौकात करीत होते.त्यामुळे सर्वच चौक सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत विविध पक्षांच्या कार्यकत्यांनी गजबजून जात होते.निवडणुका पार पडताच कार्यकर्ते कामाच्या शोधात फिरत असल्याने चौकाचौकांत शुकशुकाट पसरला आहे.अनेकांच्या हाती काम लागले आहे, तर काहींच्या हाती अद्यापही काम मिळाले नसल्याने आता त्यांची चिंता वाढली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणाचा गडचिरोली जिल्ह्यात खून..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातून एक खळबळ उडवणारी घटना उघडकीस आली आहे.  एका ३४ वर्षीय तरुणाच्या डोक्यात अज्ञाताने तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केल्याची घटना...

लाईनमनला ‘एसीबी’चा जोरदार झटका..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका ३६ वर्षीय कंत्राटी लाईनमनला नागपूरच्या एसीबी पथकाने तब्बल ८ हजार ५०० रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडुन जोरदार झटका दिला आहे.मुकेश...

ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक; सहा जणांचा जागीच मृत्यू,तर सात जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गोंदिया-बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गोंदिया-बालाघाट मार्गावरील नागरा परिसरात एका भरधाव ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार...

शासकीय शुल्काव्यतिरिक अतिरिक्त रकमेची मागणी; केवळ १५० रुपये घेतांना सेतू केंद्र चालकाला रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नागरिकांना वेळेत व तात्काळ शासकीय प्रमाणपत्रे मिळावीत,यासाठी ऑनलाईन सेतू केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.मात्र,काही सेतू केंद्र चालक मनमानी कारभार करून शासकीय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!