Tuesday, September 8, 2026
Homeमुंबई"गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार २.०" -गोंदिया आणि गडचिरोलीसारख्या आदिवासी जिल्ह्यात योजनेच्या कामांमध्ये लक्षणीय...

“गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार २.०” -गोंदिया आणि गडचिरोलीसारख्या आदिवासी जिल्ह्यात योजनेच्या कामांमध्ये लक्षणीय वाढ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई/गडचिरोली :-राज्यातील जलसुरक्षा बळकट करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार उपक्रमाला राज्यभरात प्रचंड प्रतिसाद मिळत असून या योजनेमुळे हजारो जलसाठ्यांची क्षमता वाढली आहे.योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच ‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार २.०’ अंतर्गत मोठ्या प्रमाणावर गाळ उपसा करून शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत असल्याचे दिसून येत आहे.
राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील सुमारे ३ हजार २६८ जलसाठ्यांमधून आतापर्यंत ७.७३ कोटी घनमीटर इतका काढण्यात आला आहे.त्यामुळे ७७ लाख पाण्याच्या टँकर इतकी जलसाठवण क्षमता पुनर्संचयित झाली असून ११ हजार ५८३ गावांतील सुमारे १ कोटी ३९ लाख नागरिकांना त्याचा लाभ झाला आहे.सुमारे ६९ हजार शेतकऱ्यांनी गाळ आपल्या शेतात नेला,त्यापैकी ९१ टक्के शेतकरी वंचित घटकांतील आहेत.
२०२५-२६ या आर्थिक वर्षात योजनेला अधिक गती मिळाली असून १ हजार ३९८ जलसाठ्यांमधून २.६९ कोटी घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.यामुळे जवळपास २६ हजार शेतकऱ्यांना फायदा झाला. भंडारा आणि जळगाव जिल्ह्यांत अनुक्रमे ३२ लाख आणि १६ लाख घनमीटर गाळ मंजूर करण्यात आला असून मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे ३०० टक्के वाढ झाली आहे.तसेच गोंदिया आणि गडचिरोलीसारख्या आदिवासी जिल्ह्यांतही योजनेच्या कामांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.राज्यभरातील ४०० पेक्षा अधिक स्वयंसेवी संस्था, ग्रामपंचायती आणि स्थानिक समुदायाच्या सहभागातून ही योजना राबविण्यात येत असून जलसाठे पुनरुज्जीवित करण्यास मदत होत आहे.
राज्यातील बहुतांश शेती पावसावर अवलंबून असल्याने जलसाठा वाढविणे आणि भूजल पुनर्भरण मजबूत करण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरत आहे. संभाव्य एल-निनोच्या पार्श्वभूमीवर जलसुरक्षा बळकट करण्यासाठी या उपक्रमाची अंमलबजावणी पुढेही सुरू ठेवण्यावर शासनाचा भर असल्याचे सांगण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गावाजवळच दर्जेदार शिक्षण; चार शाळा बनणार ‘मॉडेल शाळा’..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासीबहुल आणि दुर्गम एटापल्ली तालुक्यातील विद्यार्थ्यांना गावाजवळच आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि सर्वांगीण शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यातील चार शाळा ‘मॉडेल शाळा’...

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत; राज्यातील सर्व सहा विभागांना देणार प्रत्यक्ष भेटी.. – थेट संवादासह आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या ई-मेलवर...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत...

‘युजीसी-नेट’ परीक्षा केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात मनाई आदेश जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय परीक्षा एजन्सी(NTA),नवी दिल्ली यांच्यामार्फत आयोजित 'विद्यापीठ अनुदान आयोग-राष्ट्रीय पात्रता परीक्षा'(UGC-NET)जून-२०२६ ची परीक्षा गडचिरोली येथील शासकीय विज्ञान महाविद्यालय,चामोर्शी रोड,कन्नमवार नगर येथे...

देसाईगंजच्या जुनी वडसा येथील सिटी सर्व्हे प्रक्रिया अंतिम टप्प्यात; हरकतींसाठी पंधरा दिवसांची मुदत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भूमी अभिलेख विभागामार्फत देसाईगंज शहराच्या मौजा-जुनी वडसा येथील नगर भूमापन(सिटी सर्व्हे)प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, जमीनधारकांचे हक्क व सीमा दर्शविणारा प्रारूप...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!