Tuesday, July 21, 2026
Homeभंडारादुचाकीजवळ उभ्या असलेल्या तरुणाला चारचाकी वाहनाने नेले फरफटत; तरुणाचा करून अंत..

दुचाकीजवळ उभ्या असलेल्या तरुणाला चारचाकी वाहनाने नेले फरफटत; तरुणाचा करून अंत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील अड्याळ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नाक्याजवळ काल गुरुवारच्या रात्री भीषण अपघाताची घटना घडून एका ३२ वर्षीय तरुणाचा करून अंत झाला.अक्षय मधू नान्हे वय ३२ वर्षे,रा.नेरला,ता.पवनी,जि.भंडारा असे मृतक तरुणाचे नाव असून तो दुचाकीचा पेट्रोल संपल्याने दुचाकीसह रस्त्याच्या कडेला उभा असतांनाच सदरची घटना घडली.
पवनी तालुक्याच्या अड्याळ गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नेरला येथील अक्षय नान्हे हा काल गुरुवारच्या रात्री सव्वा आठ वाजेच्या दरम्यान दुचाकीचे पेट्रोल संपल्याने अड्याळ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नाक्याजवळील रस्त्याच्या कडेला उभा होता. अक्षय सोबत एक सहकारी असल्याने त्याला पेट्रोल आणण्यासाठी जवळच्या पंपावर पाठवले होते.या दरम्यान,विरूध्द दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाने अक्षयला जोरदार धडक देऊन दुचाकीसह काही अंतरापर्यंत फरफटत नेले.यात अक्षयला गंभीर मार लागला.अपघात घडताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत अक्षयला तात्काळ अड्याळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.मात्र,रात्रीच उपचार सुरू असतांनाच अक्षयची प्राणज्योत मालवली.घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मन सुन्न करणारी घटना..! जन्मदातीने दहा महिन्यांच्या चिमुकलीचा जीव घेतला अन् मृतदेह खांद्यावर घेऊन पोहचली ठाण्यात..

उद्रेक न्युज वृत्त :-सोलापूर जिल्ह्यातून मन सुन्न करणारी घटना आज सोमवारी सर्वत्र उघडकीस आली. एका २६ वर्षीय जनमदात्या आईने स्वतःच्या दहा महिन्याच्या पोटच्या लेकीला संपवून...

कोणताही पात्र बांधकाम कामगार योजनांपासून वंचित राहू नये.. -प्रत्येक ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर विशेष जनजागृती मोहीम राबवा- आमदार रामदास मसराम

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,मुंबई अंतर्गत जिल्हा कामगार सुविधा केंद्र,गडचिरोली यांच्या वतीने आज,सोमवार २० जुलै रोजी देसाईगंज पंचायत समिती...

तब्बल ११७ आपले सरकार सेवा केंद्रांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात ११५ ग्रामपंचायत व दोन नगरपरिषद/नगरपंचायत स्तरावरील एकूण ११७ आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी १५ जून २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात...

सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ विद्यार्थी उतरले रत्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-देशातील सध्याचे चित्र काही खरे नाही. अनेकजण आपली जबाबदारी व चूक मान्य करण्यास तयारच नाहीत.तुम्ही काहीही करा,आम्हाला कसलाही फरक पडणार नाही....

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!