Sunday, September 6, 2026
Homeनागपूरगडचिरोली जिल्ह्यात २०० एकरमध्ये गोंडवाना विद्यापीठाची उभारण्यात येणार वास्तू- राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

गडचिरोली जिल्ह्यात २०० एकरमध्ये गोंडवाना विद्यापीठाची उभारण्यात येणार वास्तू- राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नागपूर :- गडचिरोली जिल्ह्यात २०० एकरमध्ये गोंडवाना विद्यापीठाची वास्तू उभारण्यात येणार आहे.गोंडवाना विद्यापीठाला वन व आदिवासी विद्यापीठाचा (फॉरेस्ट ॲन्ड ट्रायबल युनिव्हरसिटी) दर्जा देण्याबाबतचे विधेयक जुलै महिन्यात आणणार असल्याची माहिती राज्याचे वन व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना निमंत्रित करण्यात येणार असल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.चंद्रपूर येथील वन अकादमीतील कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

मुनगंटीवार म्हणाले,दोन दिवसांपूर्वीच गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांच्याशी यासंदर्भात चर्चा झाली.गोंडवाना विद्यापीठाला वन व आदिवासी विद्यापीठाचा दर्जा देण्यासंदर्भात काम पूर्ण होत आले आहे.गडचिरोली जिल्ह्यात २०० एकर विस्तीर्ण परिसरात गोंडवाना विद्यापीठाची भव्य वास्तू उभी राहणार आहे.विद्यापीठाला वन व आदिवासी विद्यापीठाचा दर्जा देण्यात येणार आहे.विद्यापीठात या भागातील विस्तीर्ण जंगल,स्थानिक आदिवासी, जंगलात वास्तव्य करणारे वाघ,बिबट तथा विविध वन्यप्राणी व जंगल आणि आदिवासी व आदिवासी संस्कृति यावर अभ्यास केला जाणार आहे.मार्च महिन्यातच या विद्यापीठाला वन व आदिवासी विद्यापीठाचा दर्जा देण्यासंदर्भातील विधेयक मांडण्यात येणार होते.मात्र काही कारणास्तव ते शक्य झाले नाही.असेही त्यांनी सांगितले.हे प्रस्तावित वन व आदिवासी विद्यापीठ जागतिक दर्जाचे राहणार आहे. विविध विषयांवरचा अभ्यास या ठिकाणी करता येणार आहे.या संदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून अतिशय उत्तम दर्जाचे हे विद्यापीठ व्हावे यासाठी आम्ही कामाला लागलो आहे.असेही त्यांनी म्हटले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!