उद्रेक न्युज वृत्त
संपादक/सत्यवान रामटेके
गडचिरोली :- हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार गडचिरोली जिल्ह्यात पुढील चार दिवस काही ठिकाणी हलक्या सरीचा पाऊस तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघ गर्जना आणि वादळ-वारा येणार असल्याची संभावना प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर विभागाने वर्तविले आहे.
हवामान खात्याच्या वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार २७ एप्रिल ते ३० एप्रिल २०२३ रोजी गडचिरोली,चंद्रपूर,गोंदिया,भंडारा, वर्धा आणि नागपूर याठिकाणी येलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे.हल्ली उकाड्याचे दिवस सुरू असून अवकाळी पावसाने घातलेला थैमान जणूकाही आश्चर्यकारक आहे.अशातच लहान मुले,वयोवृद्ध,तरुण युवक-युवती व इतर नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याची दाट संभावना निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी अवकाळी पडणारे पावसाचे पाणी व कडकणाऱ्या उन्हापासून बचाव करणे आवश्यक आहे.