उद्रेक न्युज वृत्त
कोंढाळा :- देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथील नव संकल्पनेची कास धरणाऱ्या शॅडो पंचायतीचे सर्वच स्तरातून नेहमी गुणगान गायले जात आहे.२५ एप्रिल २०२२ पासून निस्वार्थपणे शॅडो पंचायत कोंढाळा यांनी नव संकल्पनेच्या माध्यमातून गावातील समविचारी तरुणांनी एकत्रीत येत सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक,साहित्यिक,क्रिडा व राजकीय अश्या सर्व विविध क्षेत्रांत विकासक व संरक्षणात्मक भुमिका बजावून विवीध कार्यक्रमांच्या व उपक्रमांच्या माध्यमातून एक प्रकारे सामाजिक वातावरण गावामध्ये व इतर ठिकाणी तयार करून परिवर्तनात्मक संकल्पना व सलोखा निर्माण केला आहे.ज्याची नोंद व दखल घेत शीमग्याच्या (धुलिवंदन)दिवशी गावकऱ्यांच्या मनोरंजनासाठी मुस्कान क्रिडा,कला व ज्ञानरंजन मंडळ कोंढाळा यांनी नाटकचे आयोजन केले होते.कार्यक्रमाचे औचित्य साधून शॅडो पंचायतीतील स्वयंसेवकांच्या कार्याची दखल घेत व त्यांनी केलेल्या सामाजिक शैक्षणिक तसेच गावात व इतर ठिकाणी निर्माण केलेल्या वातावरणाची नोंद घेत मुस्कान मंडळाच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शॅडो पंच्यायतीतील स्वयंसेवकांचे सत्कार करण्यात आले.
शॅडो पंचायत कोंढाळा यांच्या तर्फे आज पर्यंत विविध उपक्रम राबविण्यात आले.यात प्रामुख्याने फौजी के दिल की बात,आपदा मित्रांचा सत्कार,रक्तदान शिबीर, कोंढाळा क्रिडा व सांस्कृतिक महोत्सव,भींती रंगवा,सामुहिक रित्या वैचारिक दिवाळी,कराटे प्रशिक्षण,मासीक पाळी स्वच्छता दिवस मार्गदर्शन, वृक्ष लागवड,शिक्षण दिंडी,नदी स्वच्छता,गाव स्वच्छता अभियान,स्पर्धा परीक्षा,करिअर व उच्च शिक्षण मार्गदर्शन,दारूबंदीबाबत सकारात्मक भूमिका, प्रेरणादायी व्यक्तिमत्वांचे मार्गदर्शन,शालेय विद्यार्थ्यांची परेड व इतर अश्या अनेक परिवर्तनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.अश्याच प्रकारची प्रेरणा घेत जिल्ह्यातील बरीच गावे शॅडो पंच्यायतीचे उपक्रम राबवीत आहेत.सुरवातीला ३ संख्या असलेल्या शॅडो पंचायतीचे सध्या गावात ५० हुन अधिक तरूण स्वयंसेवक आहेत.विवीध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते,सेवाभावी अधिकारी,लोकनेते व अभ्यासक अश्या बऱ्याच लोकांनी शॅडोच्या च्या स़कल्पनेला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या पाठिंबा दिला आहे.
राजकीय क्षेत्रातील आमदार,खासदार व अनेकांनी शॅडोच्या स्वयंसेवकांना भेटून प्रोत्साहीत केले आहे. सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी मीळून ५० हजारांहून अधिक ईतके रूपये आजवर शॅडोच्या संकल्पनेला आर्थीक मदत म्हणून दिले आहेत.
कितीतरी गावांची मागणी आहे की कोंढाळा येथे सुरू झालेली संकल्पना त्यांच्या ही गावात व्हावी. नाविन्यपूर्ण परिवर्तनकारी संकल्पना आपल्या गावात सुरू झाली आणि तीने जिल्हातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या गावाचा नाव अनेक ठिकाणी कोरले गेले आहे.सर्व बाबी लक्षात घेता संकल्पनेचा सत्कार करीत त्यांना व त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देणे म्हणून मुस्कान क्रिडा कला व ज्ञान रंजन मंडळ यांनी सत्कार सोहळा घडवून आणला.सत्कार सोहळ्या दरम्यान विवीध क्षेत्रातील मान्यवरांनी शॅडो पंचायतीच्या संकल्पनेवर मत व्यक्त करीत शॅडोच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.सत्कार स्विकारतांना शॅडो चे सर्व स्वयंसेवक उपस्थतित होते.