Saturday, April 18, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यात कलम ३६ लागू...

गडचिरोली जिल्ह्यात कलम ३६ लागू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यात विविध धार्मिक सण,उत्सव शांततेत पार पाडावे; याकरीता कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी ३ ते १८ ऑक्टोंबरच्या मध्यरात्रीपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत कलम ३६ चे पोटकलम ‘अ’ ते ‘फ’ लागू केले आहे.
या अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी वागणुकीबाबत,वाद्य वाजविणे बाबत,सभेचे आयोजन व मिरवणुक काढण्याबबात,मिरवणूकीचे मार्ग निश्चित करण्याबाबत,लाऊडस्पिकर वापरण्याबाबत योग्य निर्बंध व निर्देश देण्याचे अधिकार गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहे.यात
अ) मिरवणुक व सभेच्या ठिकाणी त्यातील लोकांचे वागणुकीबाबत योग्य निर्देश देण्याचे अधिकार,
आ) मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारित करणे तसेच धार्मिक पुजा स्थानाचे जवळ लोकांचे वागणुकीचे निर्बंध घालण्याचे अधिकार,
इ) मिरवणुकीस बाधा होणार नाही, याबाबतचे आदेश तसेच धार्मिक पुजा स्थानाच्या जवळ  लोकांचे वागणुकीवर निर्बंध घालण्याचे अधिकार,
ई) सार्वजनिक रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी वाद्य वाजविणे, गाणी गाणे, ढोल ताशे वाजविणे  इत्यादिचे निर्बंध घालण्याचे अधिकार,
उ) रस्ते व इतर सर्व  सार्वजनिक ठिकाणी    सुव्यवस्था ठेवण्यासाठी निर्देश देण्याचे अधिकार,
ऊ) सार्वजनिक  ठिकाणी,रस्त्यावर लाउडस्पिकर वाजविण्यावर निर्बंध तसेच मर्यादा घालण्याचे अधिकार
ऋ) कलम ३३,३५,३७ ते ४०,४२,४३, व ४५ मुंबई पोलिस अधिनियमान्वये काढण्यात आलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे व सुचना देण्याचे अधिकारांचा समावेश आहे.
सदर आदेश लागू असताना सभा,मिरवणुकीत वाद्य वाजविणे,लाऊडस्पिकर वाजविणे,मिरवणुकीत नारे लावणे,मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारित करण्यासाठी संबंधित ठाणे अंमलदार यांची परवानगी घेण्यात यावी.सर्व बाबतीत पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच त्यांच्यापेक्षा कनिष्ठ दर्जाचे सर्व पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या निर्देशाचे पालन करावे; असे जिल्हा पोलिस अधिक्षक निलोत्पल यांच्या आदेशात नमूद आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

मोहफुले वेचत असतांनाच बिबट्याचा हल्ला.. – जंगलशिवारात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीटातील एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!