Thursday, April 30, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघ निवडणूक कार्यक्रम जाहीर…-२० मार्चपासून स्विकारणार नामनिर्देशनपत्र…-२८ मार्च ला...

गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघ निवडणूक कार्यक्रम जाहीर…-२० मार्चपासून स्विकारणार नामनिर्देशनपत्र…-२८ मार्च ला सकाळी नामनिर्देशन पत्राची छाननी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके

गडचिरोली :- भारत निवडणूक आयोगाने १२- गडचिरोली-चिमुर (अज) लोकसभा मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणूक-२०२४ कार्यक्रमाची घोषणा केलेली आहे.त्यानूसार लोकसभा निवडणूकीची सुचना दिनांक- २० मार्च २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून दिनांक- २० मार्च २०२४ ते दिनांक-२७ मार्च २०२४ (सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त) या कालावधीत सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत निवडणूकीचे नामनिर्देशनपत्र निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय,१२- गडचिरोली-चिमुर (अज) मतदार संघ,जिल्हा नियंत्रण कक्ष,पहिला मजला (जुने नियोजन भवन),जिल्हाधिकारी कार्यालय,गडचिरोली येथे स्विकारण्यात येणार आहे. तसेच दिनांक- २८ मार्च २०२४ ला सकाळी ११.०० वाजता नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात येईल. उमेदवारी मागे घेण्याची वेळ दिनांक- ३० मार्च २०२४ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत असून दिनांक- १९ एप्रिल २०२४ ला मतदान घेण्यात येईल.मतदानाची वेळ पुढीलप्रमाणे राहील.

६६-आमगांव (अज) वि.स.नि.क्षेत्र- सकाळी ७.०० वाजता ते दुपारी ३.०० पर्यंत, ६७- आरमोरी (अज) वि.स.नि.क्षेत्र- सकाळी ७ ते दुपारी ३ पर्यंत,६८- गडचिरोली (अज) वि.स.नि.क्षेत्र– सकाळी ७ ते दुपारी ३ पर्यंत,६९- अहेरी (अज) वि.स.नि.क्षेत्र – सकाळी ७ ते दुपारी ३.०० पर्यंत,७३- ब्रम्हपूरी वि.स.नि.क्षेत्र – सकाळी ७ ते सायं.६ पर्यंत,७४-चिमुर वि.स.नि.क्षेत्र – सकाळी ७.०० ते सायं.६.०० पर्यंत, मतमोजनी दिनांक- ४ जून २०२४ ला होईल.वरीलप्रमाणे निवडणूक कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय दैने यांनी कळविले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!