Wednesday, August 19, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोलीहून चामोर्शी जातांना अपघात; दोघांचा घटनास्थळीच मृत्यू..

गडचिरोलीहून चामोर्शी जातांना अपघात; दोघांचा घटनास्थळीच मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-दिवसेंदिवस अपघातांची मालिका संपता संपेना..! काही जणांना वाहने जोरात चालविण्याची सवय जडलेली दिसून येते.आजची तरुणाई सुसाट वाहने पळवून मोठ्या अपघातांना सामोरे जातांना दिसून येत आहे.आपण अपघातांकडे एक नजर टाकली तर सर्वात जास्त होणारे अपघात हे तरुणांचेच,असे हल्ली निदर्शनास येऊ लागले आहे.अश्यातच आज,रविवार ११ मे रोजी दुपारच्या सुमारास गडचिरोली-चामोर्शी महामार्गावरील कुरुड गावाजवळील वळणावर मोठा अपघात घडला.यात दोन तरुण घटनास्थळीच गतप्राण झाले.प्रतीक निळकंठ निमसरकार वय २६ वर्षे,रा.आष्टी, ता.चामोर्शी,जि.गडचिरोली व सचिन विनायक रोहनकर वय २६ वर्षे, रा.गणेशनगर,चामोर्शी,असे घटनास्थळीच मृत्यू झालेल्या दोन तरुणांची नावे आहेत.
माहितीनुसार,प्रतीक निमसरकार व सचिन रोहनकर हे दोघेही गडचिरोली वरून दुचाकी क्रमांक-एमएच ३३ झेड २०४८ ने चामोर्शी जात होते.त्यातच गडचिरोली-चामोर्शी महामार्गावरील कुरुड गावनजिक रस्त्याच्या कडेला एक ट्रॅक्टर उभा होता.अश्यातच कुरुड गावाजवळील बसस्थानकाच्या पुढे रस्त्याच्या वळणावर उभ्या ट्रॅक्टरला दुचाकीची जोरदार धडक बसली.धडक बसताच दोघेही दूरवर फेकले जाऊन जागीच मृत्यूमुखी पडले.घटनेची माहिती चामोर्शी पोलिसांना कळताच घटनास्थळी दाखल होत मृतदेह ग्रामिण रुग्णालय चामोर्शी येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात आले.सदर घटनेचा पुढील तपास चामोर्शी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमुल कादबाने  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस प्रशासन करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज एमएसडब्ल्यूच्या विद्यार्थ्यांना विविध संस्था भेटीतून सामाजिक कार्याचे मोलाचे मार्गदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज अनिकेत समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीने नुकतेच एम.एस.डब्ल्यू.(समाजकार्य पदव्युत्तर पदवी) अभ्यासक्रमाच्या १२० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांसाठी विविध सामाजिक संस्थांना संस्था भेटीचे आयोजन करण्यात आले.या भेटीदरम्यान...

विजेचा जोरदार शॉक; दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त पुणे :-घराजवळ असणाऱ्या जनावरांच्या गोठ्याजवळ विजेचा जोरदार शॉक लागून दोन सख्ख्या चुलत भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,बुधवार १९ ऑगस्ट रोजी सकाळी...

खुद्द पत्नीनेच प्रियकर दिराच्या मदतीने पतीचा काढला काटा.. -अनैतिक संबंधाचा बिन भाड्याच्या खोलीत ‘दी एंड’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-अनैतिक संबंधात आडकाठी येणाऱ्या पतीचा खुद्द पत्नीनेच प्रियकर चुलत दिराच्या मदतीने काटा काढल्याची घटना वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यातील वडनेर पोलिस ठाण्याच्या...

विद्यमान आमदारांच्या पीए व वाहनचालकांच्या मानधनात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्याच्या विधानसभा आणि विधान परिषदेच्या विद्यमान आमदारांचे स्वीय सहाय्यक म्हणजेच पीए आणि वाहनचालकांच्या मानधनात दहा हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.सदरची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!