Tuesday, September 22, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोलीत ३ दिवसीय “लोक नृत्य भारत भारती” महोत्सवाचे आयोजन.. - लोकनृत्यांच्या रंगारंग...

गडचिरोलीत ३ दिवसीय “लोक नृत्य भारत भारती” महोत्सवाचे आयोजन.. – लोकनृत्यांच्या रंगारंग सादरीकरणांचा मनमोहक मोफत कार्यक्रम..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-भारत सरकारचे सांस्कृतिक मंत्रालय
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर व महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने “लोक नृत्य भारत भारती” महोत्सवाचे आयोजन विद्याभारती कन्या हायस्कूल गडचिरोली येथे येत्या १ मार्च ते ३ मार्च २०२५ दरम्यान दररोज संध्याकाळी ६.३० वाजता करण्यात आले आहे.
सांस्कृतिक कार्य मंत्री महाराष्ट्र राज्य आशिष शेलार यांच्या संकल्पनेनुसार,सांस्कृतिक कार्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली व सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबईचे संचालक विभीषण चवरे आणि दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरच्या संचालिका श्रीमती आस्था कार्लेकर यांच्या नियोजनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन होत आहे.
भारताची वैविध्यपूर्ण संस्कृती व लोककला पुनर्जीवित करण्यासाठी तसेच नव्या पिढीला याची ओळख करून देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.भारतीय लोककलांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि स्थानिक कलाकारांना मंच उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकार व महाराष्ट्र शासन संयुक्तपणे प्रयत्नशील आहेत.या तीन दिवसीय महोत्सवामध्ये भारताच्या विविध राज्यांतील
लोकनृत्यांच्या रंगारंग सादरीकरणांचा मनमोहक कार्यक्रम होणार आहे.
 महाराष्ट्र : प्रसिद्ध लावणी/कोळी नृत्य,
मध्य प्रदेश : बधाई / नोरता नृत्य,
राजस्थान : रंगीला कालबेलिया/ भवई/चरी नृत्य,
हरियाणा : घूमर/ फाग नृत्य,
गुजरात : सिद्धी धमाल नृत्य,
ओडिशा : सांबलपुरी/दालखाई नृत्य
या महोत्सवासाठी दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था, गडचिरोली यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे.सदरचा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून सर्व रसिक प्रेक्षकांनी महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र,नागपूरच्या संचालिका श्रीमती आस्था कार्लेकर गोडबोले व विभीषण चवरे संचालक  सांस्कृतीक कार्य मुंबई यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता देसाईगंज तालुक्याच्या ग्रामपंचायतींमध्ये भ्रष्टाचाराचा कळस..!

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-नुकतेच गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यांची आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आलीत. सार्वजनिक निधीचा अपहार करणे आणि शासकीय योजनांमध्ये...

‘लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत गणेश मंडळांमध्ये शासकीय योजनांची जनजागृती..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना व सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय,गडचिरोलीमार्फत विविध गणेश मंडळांना...

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!