- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राचा प्रचार व प्रसार करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषद गडचिरोली यांच्या वतीने १२ मे ते ३१ मे २०२५ या कालावधीत दोन टप्प्यांमध्ये क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
पहिला टप्पा १२ ते २१ मे आणि दुसरा टप्पा २२ ते ३१ मे दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. सदरचे शिबीर जिल्हा क्रीडा संकुल,क्रीडा व सांस्कृतिक भवन, कॉम्प्लेक्स एरिया,क्रीडा प्रबोधिनी व जिल्हा स्टेडियम पोटेगाव रोड गडचिरोली येथे सकाळी ५.३० ते ८ आणि सायंकाळी ५.३० ते ८ या वेळेत होणार आहे.या प्रशिक्षण शिबिरात कुस्ती,व्हॉलीबॉल,बॉक्सिंग,खो-खो, कबड्डी, मैदानी खेळ व बॉल बॅडमिंटन अशा विविध खेळांचे तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे.१० वर्षावरील सर्व मुलामुलींना या शिबिरात सहभागी होता येईल.शिबिरात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात विहित नमुन्यात अर्ज करून ११ मे २०२५ पर्यंत कार्यालयीन वेळेत नाव नोंदणी करावी व जास्तीत जास्त खेळाडूंनी या शिबिरात सहभाग घ्यावा,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी केले आहे.
- Advertisement -

