Sunday, August 9, 2026
Homeजळगांवतीन दिवसांपूर्वीच लग्न आणि आज सीमेवर जाण्यासाठी रवाना.. - देशसेवेपेक्षा मोठे काहीही...

तीन दिवसांपूर्वीच लग्न आणि आज सीमेवर जाण्यासाठी रवाना.. – देशसेवेपेक्षा मोठे काहीही नाही; नवविवाहिताचे उदगार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
जळगाव :-जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धजण्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कालच्या मध्यरात्री भारताने मिशन ‘सिंदुर’ राबवून पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे ९ तळ उद्ध्वस्त केले.त्यामुळे पाकिस्तानची घाबरगुंडी झाली आहे. युद्धजण्य परिस्थिती उद्भवल्याने आयुध निर्माणी कारखान्यात दारूगोटा साठा वाढविण्याचे केंद्र सरकारने स्पष्ट निर्देश दिले आहेत.त्यानुसार आयुध निर्माणीतील कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. अशातच आता जळगाव जिल्ह्यातील नंदीचे खेडगाव येथील सैनिक मनोज पाटील यांना तात्काळ सेवेत रुजू होण्याचे फर्मान सोडण्यात आले आहे.विशेष म्हणजे, मनोज पाटील यांचा नुकताच सोमवार ५ मे रोजी विवाह सोहळा पार पडला.देशात युद्धजण्य परिस्थिती असल्याने मनोज यांना त्वरेने बोलावण्यात आले आहे. यासाठी आज,गुरुवार ८ मे रोजी सीमेवर जाण्यासाठी रवाना झाले आहेत. लग्नासाठी सुट्टी घेऊन मनोज गावी परतला होता. पाचोरा येथे लग्न समारंभ पार पडत नाही,तोच सरकारने मनोज यांना कर्तव्याच्या ठिकाणी त्वरेने बोलावणे आले आहे.कुटुंबासोबत लग्नाचा आनंद साजरा होत असतांनाच कर्तव्यावर जावे लागल्याचा मनोजला गर्व आहे.देशसेवेपेक्षा मोठे काहीही नाही, अशा भावना मनोजने व्यक्त केली.तर त्यांची पत्नी यामिनी हिनेदेखील या कठीण परिस्थितीत देशसेवेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे म्हटले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एकेकाळी ज्या भागात फडकायचे लाल,काळे झेंडे; आता पहिल्यांदाच फडकणार तिरंगा..

उद्रेक न्युज वृत्त :-देशातील नक्षलवादाची संपूर्ण मुळे ३१ मार्च २०२६ पर्यंत उपटून फेकण्यात येणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर करताच राज्याच्या विविध जिल्ह्यातील...

महागाईची झळ; दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतीसह दूध विक्रीत होणार वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-अगोदरच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असतांनाच आता त्यात आणखी भर पडून दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिकांनी दूध विक्रीच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची...

गडचिरोलीची बदनामी करण्याचा डाव; नागरिकांनी तथ्य पडताळूनच माहिती शेअर करावी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था आणि रस्त्यांच्या स्थितीबाबत जुनी, वस्तुस्थितीशी विसंगत तसेच अन्य राज्यांतील छायाचित्रे गडचिरोलीतील असल्याचे भासवून...

शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती प्रक्रियेस सुरुवात; राज्यात ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र पोर्टल'द्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरू करण्यात आली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!