- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-मतदार संघातील समस्यांवर,सामान्य माणसाच्या दुखण्यावर,वेदनेवर आणि दारिद्ररेषेखालील यादीतून बाहेर पडण्यासाठी प्रामाणिक संघर्ष करणाऱ्या कुटुंबाचे प्रश्नांवर राज्यात कुणीही बोलतांना दिसले नाही.एकमेकांवर टीका टिपण्णी झालीच,काहींनी तर कौटुंबिक वाद चार चौघात आणून ठेवला.निवडणुकीच्या आखाड्यातील ही लढाई बघता-बघता रस्त्यावर आली.
येथे समस्यांचा,प्रश्नांचा ढीग आहे.वेगवेगळ्या विषयाच्या डिगऱ्या हातात असतांना,दोनशे,तीनशे रुपयाची मजुरीसाठी राज्याची सीमा ओलांडणारा बेरोजगार तरुण नेत्यांना दिसत नाही.दिसला तर त्यावर कुणी बोलत नाही.गरीब मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत पिण्याचे शुद्ध पाणी नाही. बसायला नीट जागा नाही.विद्यार्थी आहेत मात्र शिक्षक नाहीत.शिक्षक असले तर विद्यार्थी नाही; अशी बिकट अवस्था ग्रामीण भागातील शैक्षणिक व्यवस्थेची झालेली आहे.किती-किती प्रश्न,हे प्रश्न कुणालाही महत्त्वाचे वाटू नये,हिच मोठी शोकांतिका आहे.
खुर्चीसाठी लाखो-करोडो रुपये उधळणारे नेते जनतेच्या महत्वाच्या प्रश्नांकडे खरंच लक्ष देतील काय? यांना गरिबांचे दुखणे कळेल काय? विधानसभा निवडणुकीत पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला ही चर्चा जरी खरी असेल तर जनतेची सेवा करण्याची प्रामाणिक इच्छा असणारा गरीब नेता, सामाजिक कार्यकर्ता निवडणुकीत उभे राहण्याची हिंमत करेल काय? ही सिस्टम फारच घातक ठरणारी आहे.
राज्यातील वेगवेगळ्या मतदार संघात पैसे वाटपाच्या ज्या घटना पुढे आल्यात किंवा ज्या चर्चा आहेत.त्याची गंभीरतेने दखल निवडणूक आयोगाने घ्यायला हवी.दोषी असल्यावर कठोर कार्यवाही होणे गरजेचे आहे.नाहीतर ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांचेच राजकारण असेल.तसे झाले तर लोकशाहीसाठी हे फारच घातक ठरणारे आहे.
- Advertisement -