Saturday, June 13, 2026
Homeगडचिरोलीमतमोजणीच्या आरमोरी मतदासंघात २३ फेऱ्‍या, गडचिरोलीत २६ फेऱ्या तर अहेरीत २२ फेऱ्या..

मतमोजणीच्या आरमोरी मतदासंघात २३ फेऱ्‍या, गडचिरोलीत २६ फेऱ्या तर अहेरीत २२ फेऱ्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-विधानसभा निवडणूक मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन पूर्णतः सज्ज झाले असून या व्यवस्थेची पाहणी आज निवडणूक निरीक्षक राजेंद्र कुमार कटारा व जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांचेकडून करण्यात आली.यावेळी मतमोजणीकरीता नेमण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणही घेण्यात आले.
विधानसभा मतदारसंघाची निवडणूक २० नोव्हेंबर रोजी पार पडली असून उद्या,शनिवार २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.आरमोरी विधानसभा मतदार संघाची मतमोजणी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ,आरमोरी रोड देसाईगंज(वडसा) येथे, गडचिरोली विधानसभा मतदार संघाची मतमोजणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली येथे तर अहेरी विधानसभा मतदार संघाची मतमोजणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागेपल्ली ता. अहेरी येथे होणार आहे.प्रसंगी आज मतमोजणी व्यवस्थेचा आढावा संबंधीत निवडणूक निरीक्षक यांनी घेतला.विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणीकरीता टेबलची व्यवस्था,उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी व मतमोजणी प्रतिनिधींच्या बसण्याची व्यवस्था,लावण्यात आलेले बॅरीकेटींग, सीसीटीव्ही,विद्युत व्यवस्था,स्ट्राँगरूम,सुरक्षा व्यवस्था, मिडीया सेंटर आदींची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला.निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे कटाक्षाने पालन करून मतमोजणी प्रक्रिया नियोजनबद्ध पार पाडण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या.
मतमोजणीचे टेबल व एकूण फेऱ्या व मनुष्यबळ👇
आरमोरी मतदार संघात मतमोजणीसाठी १४ इव्हीएम टेबल,२३ फेऱ्या,९ टपाली मतपत्रिकेच्या मतमोणीचे टेबल व ईटीपीबीएस (सर्व्हिस व्होटर मतपत्रिका) च्या मोजणीसाठी २ टेबल राहणार आहेत.यासाठी एकूण ८८ मतमोजणी पर्यवेक्षक व मतमोजणी सहायक नियुक्त करण्यात आले आहेत.
गडचिरोली मतदार संघात मतमोजणीसाठी १४ इव्हीएम टेबल,२६ फेऱ्या,१० टपाली मतपत्रिकेच्या मतमोणीचे टेबल व ईटीपीबीएस (सर्व्हिस व्होटर मतपत्रिका)च्या मोजणीसाठी २ टेबल राहणार आहेत. यासाठी एकूण ८० मतमोजणी पर्यवेक्षक व मतमोजणी सहायक नियुक्त करण्यात आले आहेत.
अहेरी मतदार संघात मतमोजणीसाठी १४ इव्हीएम टेबल,२२ फेऱ्या,९ टपाली मतपत्रिकेच्या मतमोणीचे टेबल व ईटीपीबीएस (सर्व्हिस व्होटर मतपत्रिका) च्या मोजणीसाठी २ टेबल राहणार आहेत.यासाठी एकूण ८९ मतमोजणी पर्यवेक्षक व मतमोजणी सहायक नियुक्त करण्यात आले आहेत.
सुरक्षा व्यवस्था👇
मतमोजणी केंद्राच्या सभोवताली सुरक्षा रक्षक तैनात असून यात १०० मीटर परिघापासून राज्य पोलिस, मतमोजणी आवाराच्या प्रवेशद्वारावर राज्य सशस्त्र पोलिस आणि मतमोजणी कक्षाच्या द्वाराजवळ केंद्रीय सशस्त्र पोलिस दल तैनात आहेत.
मोबाईल व इलेक्ट्रॉनिक वस्तुंना प्रतिबंध👇
मतमोजणी केंद्रात मोबाईल,कॅमेरा,लॅपटॉप,आयपॅड, तसेच कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तु नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनासुध्दा केवळ मिडीया सेंटरमध्येच मोबाईल/लॅपटॉपचा वापर करता येईल.प्रत्यक्ष मतमोजणी केंद्रात जातांना मोबाईल,कॅमेरा मिडीया सेंटर येथे जमा करावा लागेल.निवडणूक आयोगाचे प्राधिकारपत्र असलेल्या प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनाच केवळ मिडीया कक्षात प्रवेश राहील.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

खर्रा खाणाऱ्यांनो सावधान..! बाजारात नकली तंबाखूचा शिरकाव.. – मशीनच्या सहाय्याने नकली तंबाखू तयार करणाऱ्यासह ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विदर्भातील बऱ्याचश्या जिल्ह्यात आजही जवळपास ७० ते ८० टक्के लोकं खर्रा खाण्याचे शौकीन आहेत.तंबाखूची वाढती मागणी लक्षात घेता "मरणारे मरोत आणि...

देसाईगंज शहरातील पाणी पुरवठा योजनेचे काम संथगतीने करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत देसाईगंज शहरात कोट्यवधी रुपयांचे पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने कामाच्या विलंबामुळे शहरातील नागरिकांना पिण्याच्या...

बांधकाम कामगार योजनांचा लाभ घेण्यासाठी ९० दिवस काम केल्याचे बनावट प्रमाणपत्र; ११ जणांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कंत्राटदार,ऑनलाइन सेवा केंद्र संचालक व एजंट यांच्या संगनमताने करण्यात आलेल्या बोगस कामगार नोंदणीचे रॅकेट उघडकीस येताच तब्बल ११ जणांवर गुन्हे दाखल...

हायवा ट्रकचा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-एका अनियंत्रित हायवा ट्रकचा अपघात होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज, गुरुवार ११ जून रोजी पहाटेच्या सुमारास ब्रम्हपुरी तालुक्यातील पारडगाव...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!