Saturday, August 1, 2026
Homeगोंदियाखुद्द जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षकांचा वाळू माफियांना दणका..! - ७ पोकलॅन,४ टीप्परसह १...

खुद्द जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षकांचा वाळू माफियांना दणका..! – ७ पोकलॅन,४ टीप्परसह १ हजार ब्रास अवैध वाळूसाठा जप्त..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-अवैध वाळू उपसाच्या माध्यमातून गब्बर बनू पाहणाऱ्या वाळू माफियांना गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रदीप नायर व जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी दणका देत वाळू घाटावर धाड मारून तब्बल ७ पोकलॅन,४ टीप्पर आणि १ हजार ब्रास अवैध वाळूसाठा जप्त केला आहे.सदरची कारवाई काल,शनिवारी ११ जानेवारीच्या रात्री केल्याने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.
सध्या स्थितीत वाळू घाटांचे लिलाव झाले नसल्याने सर्वत्र मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू आहे.अशातच याबाबत तालुका महसूल प्रशासनास तक्रारी करूनही त्याकडे कानाडोळा केला जात असल्याचा प्रकार उघडकीस येऊ लागला आहे. गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा व वाहतूक होत असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी तिरोडा महसूल विभागाकडे केल्या.मात्र,याकडे तालुका महसूल प्रशासनाने दुर्लक्ष केले.त्यामुळे नागरिकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून याबाबत आपबिती कळवून तक्रार दाखल केली.त्यानुसार काल,शनिवारी रात्रीच्या सुमारास खुद्द जिल्हाधिकारी प्रदीप नायर आणि जिल्हा पोलीस अधिक्षक गोरख भामरे यांनी गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील
घाटकुरोडा वाळू घाटावर धाड टाकून ७ पोकलॅन,४ टीप्पर आणि १ हजार ब्रास अवैध वाळूसाठा जप्त केला आहे.
खुद्द जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अवैध वाळू उपसा प्रकरणी कारवाई करतात,मात्र,तालुका स्तरावरील महसूल विभाग व पोलीस विभाग मुंग गिळून गप्प कां? असा प्रश्न निर्माण झाला आहे.एवढी मुकसंमती असणे म्हणजे,
कुठेतरी पाणी मुरल्या जात आहे; असे म्हणजे चुकीचे ठरणार नाही.त्यामुळे वाळू चोरट्यांसह संबंधितांवर कारवाई होणे आवश्यक असल्याचा सुर सर्वत्र उमटू लागला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सामाजिक वनीकरण विभागाचा विभागीय वन अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  बीड :-तक्रारदारास तंबी देऊन तब्बल ४५ लाख रुपयांची लाच स्वीकारतांना बीड जिल्ह्याच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वन अधिकाऱ्यास(DFO)छत्रपती संभाजीनगरच्या लाच लुचपत प्रतिबंधक...

क्रिकेटपटू तरुणीने उचलले टोकाचे पाऊल; गळफास घेऊन संपवले जीवन..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-क्रिकेटच्या मैदानावर मोठे नाव कमावण्याची स्वप्ने उराशी बाळगणाऱ्या एका १७ वर्षीय क्रिकेटपटू तरुणीने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना नागपूरच्या बजाजनगर पोलिस...

नव्या परिस्थितीनुसार आपत्ती व्यवस्थापनाची कार्यपद्धती विकसित करण्याची गरज.. -नदीकाठील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या-सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बदलत्या हवामानामुळे अल्प कालावधीत अतिवृष्टी होऊन पूरस्थिती निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी अधिक सक्षम करण्यावर भर देण्याचे निर्देश सहपालकमंत्री...

जिल्हा परिषदांसह मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार एकाचवेळी होण्याची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील ५० टक्के ओबीसी आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या तब्बल २२ जिल्हा परिषदांच्या निवडणूका अद्यापही रखडल्या आहेत.विशेष म्हणजे,ज्या ठिकाणी मर्यादा ओलांडल्या गेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!