उद्रेक न्युज वृत्त :-संसदीय कामकाज मंत्रालयाने आज,सोमवारी २४ मार्च रोजी अधिसूचना जारी करीत खासदारांच्या वेतनात २४ टक्के वाढ केली आहे.सदरचे वाढीव वेतन हे १ एप्रिल २०२३ पासून लागू होईल.त्यानुसार आता खासदारांना १ लाख २४ हजार रुपये एका महिन्यात मिळणार आहेत.पूर्वी खासदारांना १ लाख रुपये महिन्याकाठी मिळायचे. वेतन वाढ सोबतच दैनिक भत्ता आणि पेन्शनमध्येही वाढ करण्यात आली आहे. दैनिक भत्ता २००० रुपयांवरून २५०० रुपये करण्यात आला आहे.पाच वर्षांहून अधिक काळ खासदार राहिलेल्या सदस्यांना मिळणारे अतिरिक्त पेन्शनही दरमहा २००० रुपयांवरून २५०० रुपये करण्यात आले आहे.पगार आणि पेन्शन व्यतिरिक्त, खासदारांना मोफत हवाई, रेल्वे आणि रस्ते प्रवासाची सुविधा तसेच इतर सोयी सुविधा मोफत मिळत असतात. खासदारांच्या कुटुंबातील सदस्यांनाही मर्यादित प्रवास सुविधा मिळतात.माजी खासदारांचे पेन्शन दरमहा २५,००० रुपयांवरून ३१,००० रुपये करण्यात आले आहे.वाढीव वेतन संदर्भात याआधी २०१८ मध्ये मोदी सरकारने दर पाच वर्षांनी खासदारांच्या वेतन आणि भत्त्यांचा आढावा घेण्याचा नियम बनवला होता.
खासदारांचे वेतन वाढ; २४ टक्के वाढ झाल्याने आता महिन्याकाठी ‘इतका’ मिळणार पगार..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक


सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES