- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-शहरी भागासह ग्रामीण भागात खर्रा खाणाऱ्यांचे प्रमाण अधिक वाढले आहे.मात्र,हाच खर्रा एका १८ वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतला असल्याची घटना नुकतीच नागपूर शहराच्या अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे.चक्क ‘खर्रा दे.!’ म्हणत खर्रा न दिल्यामुळे वस्तीत राहणाऱ्या आरोपी युवकाने हातातील लोखंडी कड्याने डोक्यावर प्रहार केल्याने एका युवकाचा मृत्यू झाला आहे.आर्यन विलास वहिले वय १८ वर्षे,रा.गल्ली नं.१०, विश्वकर्मानगर,नागपूर असे मृत युवकाचे नाव असून तो डेकोरेशनचे काम करीत होता.तर राहुल श्याम हजारे वय २४ वर्षे,रा.गल्ली नं.९,विश्वकर्मानगर, नागपूर असे आरोपीचे नाव आहे.आर्यन आठ दिवसांपासून घरी गेला नव्हता.तो १० जूनला अजनी रोडवरील फुटपाथवर झोपलेल्या अवस्थेत आढळल्याने त्याचे वडील विलास वहिले व मित्राने त्याला घरी नेले.नारळ पाणी घेऊन तो झोपला होता.अश्यातच रात्री ९ वाजेच्या सुमारास त्याची प्रकृती बिघडल्याने त्यास मेडिकलमध्ये उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.याप्रकरणी आर्यनचे वडील विलास वहिले यांच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.दरम्यान,आर्यनच्या शवविच्छेदन अहवालात त्याचा मृत्यू हेड इन्ज्युरीमुळे झाल्याचे उघड झाले.आर्यनचा मित्र राहुलने हातातील लोखंडी कड्याने डोक्यावर मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांना सांगितले.त्यावरून अजनी ठाण्याचे उपनिरीक्षक सिद्धांत मस्के यांनी आरोपी राहुल हजारे विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.इवल्याश्या क्षुल्लक कारणावरून १८ वर्षीय आर्यनचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
- Advertisement -

