Friday, June 26, 2026
Homeगडचिरोलीखताचा काळाबाजार भोवला; देसाईगंजच्या कृषी केंद्र संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल..

खताचा काळाबाजार भोवला; देसाईगंजच्या कृषी केंद्र संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदानित डीएपी खत(DAP)अनधिकृतरीत्या जिल्ह्याबाहेर विकणे,खताचा काळाबाजार करणे तसेच शासकीय ई-पॉस(e-POS) प्रणालीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी देसाईगंज येथील मे.नाकाडे कृषी केंद्रचे संचालक भास्कर महादेव नाकाडे यांच्याविरुद्ध आज,शुक्रवार १७ एप्रिल रोजी देसाईगंज पोलीस स्टेशन येथे फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी दिली आहे.
कृषी विभाग गडचिरोलीच्या जिल्हा भरारी पथकाने व तालुका गुणनियंत्रण निरीक्षकांनी ८ एप्रिल ते १२ एप्रिल २०२६ दरम्यान संबंधित कृषी केंद्राची संयुक्त तपासणी केली.या तपासणीत गंभीर अनियमितता उघडकीस आली असून,शेतकऱ्यांच्या नावे ई-पॉस मशीनवर सुमारे १.५ मेट्रिक टन डीएपी खत विक्री दाखवण्यात आली असली तरी संबंधित शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात इतक्या प्रमाणात खत घेतले नसल्याचे स्पष्ट झाले.यावरून बोगस विक्रीचे प्रकार उघड झाले आहेत.तसेच आय.एफ.एम.एस.(iFMS)पोर्टलवरील नोंदींच्या पडताळणीत सुमारे २५ मेट्रिक टन अनुदानित खताची विक्री जिल्ह्याबाहेर करण्यात आल्याचे निदर्शनास आले.याशिवाय दुकानातील साठा नोंदवही(एन फॉर्म) अद्ययावत नसणे,प्रत्यक्ष साठा व नोंदींमध्ये मोठी तफावत आढळणे आणि शेतकऱ्यांना पक्की बिले न देणे असे गंभीर प्रकारही तपासणीत समोर आले.
या प्रकरणी कृषी विभागाने ९ एप्रिल २०२६ रोजी संबंधित संचालकास कारणे दाखवा नोटीस बजावली होती.मात्र सादर केलेला खुलासा असमाधानकारक ठरल्याने तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या खत निरीक्षक शितल खोब्रागडे यांनी देसाईगंज पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली.त्यानुसार अत्यावश्यक वस्तू अधिनियम,१९५५ तसेच खत (नियंत्रण)आदेश, १९८५ मधील तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.दरम्यान,कृषी विभागाने जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांना स्पष्ट इशारा देत खत विक्रीमध्ये पारदर्शकता राखण्याचे निर्देश दिले आहेत. शेतकऱ्यांच्या हक्काच्या खताचा काळाबाजार किंवा ई-पॉस प्रणालीत कोणत्याही प्रकारची छेडछाड आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल,असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विजांच्या कडकडाटासह पाऊस; अंगावर वीज कोसळून दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात आज,शुक्रवार २६ जून रोजी विविध भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.मात्र,विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे काही तालुक्यात वीज कोसळून दुर्घटना...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गडचिरोलीतील ९६ आदिवासी विद्यार्थ्यांचे राष्ट्रपती भवनात केले स्वागत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- "मोठी स्वप्ने पाहा,शिक्षणाच्या बळावर ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा," असा प्रेरणादायी संदेश देत भारताच्या महामहिम राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांनी गडचिरोली...

डीआरआयची मोठी कारवाई; वन्यजीवांची आंतरराज्यीय तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय)प्रादेशिक युनिटने वन्यजीव तस्करीविरोधात मोठी कारवाई करत आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात बेकायदेशीर वन्यजीव तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश...

घरून निघाला ‘तो’ परतलाच नाही; ५९ वर्षीय इसम दहा दिवसांपासून बेपत्ता..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-शहराच्या श्रीनगर वार्डातील केस कटिंगचा (न्हावी)व्यवसाय करणारा ५९ वर्षीय इसम घरून दुकानात जाण्यासाठी निघाला तो अद्यापही घरी परतला नसल्याने कुटूंबीय चिंताग्रस्त...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!