Monday, July 13, 2026
Homeचंद्रपूरक्षुल्लकशा कारणावरू बेदम मारहाण; मुलाने घेतला आईचा जीव..!

क्षुल्लकशा कारणावरू बेदम मारहाण; मुलाने घेतला आईचा जीव..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-एका क्षुल्लकशा कारणावरून पोटच्या मुलाने बेदम मारहाण करून आपल्या स्वतःच्या आईचा जीव घेतल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील डोंगरगाव येथे घडली.सदरची घटना काल गुरुवारच्या रात्री घडली असून आज,शुक्रवार २० फेब्रुवारीला सर्वत्र उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ माजली. प्रकरणी मूल पोलिसांनी आरोपी मुलास अटक केली आहे.सुमित्राबाई दशरथ पेटकुले वय ६५ वर्षे, रा.डोंगरगाव,असे मृतक आईचे नाव आहे.तर जगदीश दशरथ पेटकुले वय ३६ वर्षे असे आरोपी मुलाचे नाव आहे.
गुरुवारच्या रात्री सुमित्राबाईने कारल्याची भाजी बनवली होती.कारल्याची भाजी कां बनवली म्हणून आई आणि मुलामध्ये वाद झाला.वाद होताच आरोपी मुलाने आपल्या आईला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.मारहाणीत सुमित्राबाई यांना गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाला. रात्रीची घटना असल्याने याची कानकून कुणालाही झाली नाही.मात्र,आज सकाळच्या सुमारास प्रकरणास वाचा फुटली आणि सदरची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली.लागलीच घटनेची माहिती मूल पोलीस प्रशासनास मिळताच एपीआय सुबोध वंजारी,पीएसआय वर्षा नैताम यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मुल उपजिल्हा रुग्णालयात पाठविला.प्रकरणी आरोपी मुलाविरूध्द मूल पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी जगदीश पेटकुले हा दारूच्या आहारी गेला होता.यामुळे दोन महिन्यांपूर्वी त्याची पत्नी मुलांना घेऊन माहेरी गेली होती.अश्यातच नराधमाने आपल्या वृद्ध आईचा जीव घेतला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

यालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती...

तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!