उद्रेक न्युज वृत्त
संपादक/सत्यवान रामटेके
कोरची :- छत्तीसगड आणि महाराष्ट्र सिमेवर असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मूलेटिपदिकसा येथे पारंपारिक पद्धतीने शाळा पूर्व तयारी मेळावा आयोजित करण्यात आला.सर्वप्रथम बैलगाडीवर भरती पात्र मूलांंना बसवून संपूर्ण गावात गावात प्रभातफेरी काढण्यात आली.यात गावातील सर्व मूले,महिला मंडळी,ग्रामपंचायत पदाधिकारी आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि सर्व सदस्य सहभागी झाले होते.गावातील प्रभातफेरी नंतर शाळेत शाळा पूर्व तयारी मेळावा आयोजित करण्यात आला.शैक्षणिक सत्र २०२३-२४ या वर्षात एकूण भरतीपात्र आठही विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.सर्वप्रथम विद्यार्थ्यांची वजन,ऊंची घेण्यात आली.त्यानंतर त्यांना चित्र दाखवून चित्रांची ओळख पटवून देण्यात आली.त्यानंतर लहान मोठ आखूड-लांब यातील फरक सांगण्यात आले.नंतर लांबदोरी,ऊडी,बाॅल फेकने इत्यादी खेळ घेण्यात आले.त्यानंतर सर्व विद्यार्थी आणि पालक यांना गोड जेवन देण्यात आले.सर्व स्मार्ट मातांना ऊन्हाळी सुट्यांमध्ये मूलांचा अभ्यास कसा करावा? हे सांगण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक गिरवर,भारतसागर आणि शिक्षिका किरण ठाकरे,अंगणवाडी सेविका,गावातील सूशिक्षित मुले यांचे विशेष सहकार्य लाभले.