Tuesday, October 6, 2026
Homeगडचिरोलीपोलीस अधीक्षक साहेबांचे आभार मानावे तर कसे?- गडचिरोली जिल्ह्यात अवैध धंद्यांचा पुन्हा...

पोलीस अधीक्षक साहेबांचे आभार मानावे तर कसे?- गडचिरोली जिल्ह्यात अवैध धंद्यांचा पुन्हा सुरू झालाय सपाटा; काहीजण आपलाच करताहेत बोभाटा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

संपादक/सत्यवान रामटेके

गडचिरोली :- जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी घेतलेला अवैध धंदे बंद बाबतीतील निर्णय अत्यंत वाखाणण्याजोगे होता.सदर निर्णयाने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले होते.गडचिरोली जिल्ह्यात यापूर्वी कधीही न घडणारे चित्र सर्वत्र पहावयास मिळाले होते.अवैध धंदे करणाऱ्या अनेकांना हाय अलर्ट करून घाम फोडल्या गेले होते.त्यामुळेच जिल्ह्याच्या पोलिस विभागाचे प्रमुख असलेल्या पोलीस अधीक्षक यांचे पत्ररुपी वा शब्दरुपी आभार माननारे कार्यकर्ते एका रांगेत उभे होते; मात्र अशातच जिल्ह्याच्या तालुक्यातील चित्र हल्ली बदलत असल्याचे दिसून येत आहे.काहीजण ‘आपलाच करताहेत बोभाटा तर अवैध धंद्यांचा पुन्हा सुरू झालाय सपाटा’ असे दिसून येत आहे.यामुळे पोलीस अधीक्षक साहेबांचे आभार मानावे तर कसे?असा प्रश्न पत्ररुपी वा शब्दरुपी आभार माननाऱ्या कार्यकर्त्यांना पडला आहे.

तालुक्यातील काहीजण ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका बजावतांना दिसून येत आहेत.अशांचा पुढाकार असल्याशिवाय पुढील पायरी चढणे वा उतरणे अशक्य आहे.बाहेर तालुक्यातील दुसऱ्या तालुक्यात उडी घेऊन अवैध धंदे करणाऱ्यांचे प्रमाण जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत.कुणाला कानकुन लागू नये; याकरिता तेरी ‘भी चूप मेरी भी चूप’ करून संपूर्ण ठिकाणी लुका-छुपीचा खेळ सुरू असल्याची खमंग चर्चा सर्वत्र सुरू आहे.काही जणांचे खिसे गरम होत नसले वा काही जण पैसे घेत नसले तरी वरिष्ठांकडे आपली बढाई करून अवैध धंदे करणाऱ्यांना दुजोरा देण्याचे हल्ली काम सुरू आहे. त्यामुळे अशांच्याही मुसक्या आवळणे गरजेचे आहे; असे सुजाण नागरिकांकडून वार्तालाप केले जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नितेश कराळे मास्तरांनी नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भरला उमेदवारी अर्ज..

उद्रेक न्युज वृत्त :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक,सामाजिक कार्यकर्ते तथा विदर्भातील वऱ्हाडी भाषेत स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करणारे शिक्षक म्हणून प्रसिद्ध असलेले कराळे मास्तर अर्थात नितेश...

मतदार यादी पुनरीक्षण; आता बीएलओ घरी जाऊन स्वीकारणार नोटीस प्राप्त मतदारांची कागदपत्रे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जुळवणी न झालेल्या किंवा जुळवणीत तार्किक विसंगती असलेल्या मतदारांना सुनावणीची नोटीस प्राप्त झाली असली,तरी निवडणूक...

बँकांनी कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांना तगादा लावून नये; जीवाचे बरे वाईट केल्यास यंत्रणेला जबाबदार धरले जाईल- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने सरकारकडून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना पीक कर्जवसुलीपासून दिलासा देण्यात आला आहे.अश्यातच काही बँका,पतसंस्था वा इतर वित्तसंस्था शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी...

लोखंडी पाईपांच्या आड गांजाची तस्करी; तिघांना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-लोखंडी पाईपांच्या आड लपवून आणलेला तब्बल ५०० किलो गांजाचा साठा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने(एनसीबी)नागपुरात जप्त केला.हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील स्कायलाइन ढाब्याजवळ पहाटेच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!