Monday, July 13, 2026
Homeदेसाईगंजकोकडी येथील ग्रंथपाल नंदकुमार बन्सोड यांचे दु:खद निधन…

कोकडी येथील ग्रंथपाल नंदकुमार बन्सोड यांचे दु:खद निधन…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली) :-देसाईगंज तालुक्याच्या कोकडी येथील स्व.तुकाराम धोटे सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल नंदकुमार नागोराव बन्सोड वय ५३ वर्षे यांचे काल,दिनांक-३१ जुलै रोजी रात्री ९.३० वाजता दु:खद निधन झाले. 

ज्ञान दानाचे दार उघडणारे ग्रंथालय कर्मचारी केव्हा तरी सुगीचे दिवस येणार,कधी ना कधी वेतनश्रेणी लागू होणार,या आशेवर जीवन जगत आहेत.मात्र, सार्वजनिक वाचनालयातील कर्मचाऱ्यांकडे शासन  दुर्लक्ष करीत आहे.अशातच गावात व सामाजिक कार्यात हिरहिरीने भाग घेणारे ग्रंथपाल नंदकुमार बन्सोड यांचे दुःखद निधन झाल्याने परिवारावर मोठा आघात झाला आहे.कुटुंबीयांची संपूर्ण जबाबदारी नंदकुमार यांच्यावरच होती.त्यामुळे कुटिंबियांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होऊन दुःखाचे डोंगर कोसळले आहे.नंदकुमार यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली,जावई व नात असा मोठा आप्त परिवार आहे. 

बन्सोड यांचा अंत्यविधी आज दुपारच्या सुमारास कोकडी येथील गाढवी नदीच्या तीरावर करण्यात आला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!