उद्रेक न्युज वृत्त
कोंढाळा :- देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथे जुना देऊळ हनुमान मंदीराने १५० वर्षाची परंपरा कायम राखत गावामध्ये राम जन्मोत्सव शोभायात्रा काढून राम नवमी उत्सव काल ३० मार्च रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कोंढाळा येथील जुना देऊळ हनुमान मंदिराचे ट्रस्टी अरुण कुंभलवार,माजी सभापती नितीन राऊत,हल्ली ग्रामपंचायत उपसरपंच गजानन सेलोट,उमेश राऊत,बाबुराव राऊत,वासुदेव ठाकरे,श्रीराम मोहूर्ले,हितेश तुपट,सीताराम धोटे,रामदास गुरूनुले,श्रावण राऊत,सचिन झिलपे व गावकऱ्यांच्या पुढाकाराने १५० वर्षांपासून राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.राम जन्मोत्सव दिनाचे औचित्य साधून काल रात्री ९ वाजेच्या सुमारास संपूर्ण गावात शोभायात्रा काढून राम,लक्ष्मण,सीता,हनुमान व वानर सेना यांच्या वेशभूषेत असलेले आबाल यांनी गावातील शोभा यात्रे दरम्यान सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
युवा पिढी तसेच गावातील महिला-पुरुष वर्ग यांच्या करीता डिजेच्या ताल-सुरावर थिरकणारी मंडळी शोभा यात्रेचे विशेष आकर्षण दिसून येत होते.अशात प्रभू राचंद्रांच्या वेशभूषेत रोहन गुरूनुले,सीता जान्हवी कुंभलवार,लक्ष्मण समीर मोहुर्ले तर हनुमान नैतिक तुपट व अन्य वानर सेना लहान बालकांनी साकारून शोभा यात्रेची परंपरा कायम ठेवली.
शोभा यात्रे दरम्यान गावातील प्रथम नागरिक ग्रामपंचायत सरपंचा अपर्णा नितीन राऊत,पोलीस पाटील किरणताई कुंभलवार,गावातील आबालवृद्ध, जुना देऊळ हनुमान मंदीराचे ट्रस्टी,आयोजक तथा नियोजक व गावकरी ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.