उद्रेक न्युज वृत्त
संपादक/सत्यवान रामटेके
कोंढाळा(गडचिरोली) :- देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथील विद्या निकेतन लोकमान्य टिळक शैक्षणीक संकुल शाळेच्या दहावीचा निकाल ९२.४५ टक्के लागला असून गावातील पाच विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत उंच भरारी घेतली असल्याने सदर विद्यार्थ्यांवर सर्वच स्तरातून कौतुकांचा वर्षाव केला जातो आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल जाहिर करण्यात आला आहे.त्यानुसार कोंढाळा येथील दहावीच्या परीक्षेत नंदिनी कैलास राऊत ७८.६ %, आरती विलास वांढरे ७६.६%, प्रज्वल भक्तीकिशोर बोरुले ७६.२%, निशांत किशोर दुपारे ७५% व साक्षी राजू नागमोती ७४.४% या विद्यार्थ्यांनी विद्या निकेतन लोकमान्य टिळक शैक्षणीक संकुल शाळेतून टॉप पाच मध्ये प्रावीण्य मिळविले आहे.प्रावीण्य मिळविलेल्या व उत्कृष्टरित्या पास झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन शाळेचे मुख्याध्यापक के.एम.देशमुख, एस.एस.हर्षे,आर.वाय. कन्नाके,एम.आर.इंगोले, ए.व्ही.निंबुरकर व बी.एस.पारधी यांनी केले आहे.व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.