Monday, August 17, 2026
Homeकोंढाळाकोंढाळा युवा वीर मराठा मंडळातर्फे शिवजन्मोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

कोंढाळा युवा वीर मराठा मंडळातर्फे शिवजन्मोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

कोंढाळा :- देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथे सार्वजनिक शिवजनमोत्सव सोहळा १९ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्याने १८ फेब्रुवारी रोजी मार्गदर्शन,नृत्य स्पर्धा व २९ जानेवारीला घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धा,चित्रकला व गावातील दहावी,बारावीतून प्रथम क्रमांक,द्वितीय क्रमांक येणाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.१९ फेब्रुवारी रोजी शिवपूजन,पालखी सोहळा असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.शिवजन्मोत्सवा मध्ये शिवभक्तांनी सहभागी होण्याचे आवाहन कोंढाळा येथील युवा वीर मराठा सार्वजनिक मंडळातर्फे करण्यात आले आहे.कोंढाळा येथे शिवजयंती उत्सवानिमित्त व्याख्यान शिवपूजन यांच्यासह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.१८ ते १९ फेब्रुवारी रोजी कार्यक्रमाची रेलचेल राहणार आहे . 

प्रतिष्ठेची नसली तरी चालेल पण निष्ठेची असावी; शिवजयंती घरा -घरात आणि मना-मनात असावी. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा पहिला दिवस १८ फेब्रुवारीला सकाळी ७ वाजता स्वच्छता अभियान तर सायंकाळी ७ वाजता व्याख्यान बक्षीस वितरण,नृत्य स्पर्धा तर १९ फेब्रुवारीला घरा समोर रांगोळी काढलेली असावी. उत्कृष्ट रांगोळी काढनाऱ्यास बक्षीस देण्यात येणार आहे.सायंकाळी ७ वाजे पालखी सोहळा आयोजित करण्यात आले आहे.१८ फेब्रुवारी रोजी कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून देसाईगंज ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे उपस्थित रहाणार आहेत.कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने सर्व शिवप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन युवा वीर मराठा मंडळ कोंढाळातर्फे केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गॅस सिलेंडरधारक ग्राहकांसाठी दिलासा; ई-केवायसी करण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून एलपीजी गॅस कनेक्शनची ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि साठेबाजी...

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर-रामटेक राष्ट्रीय...

साखरेच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या तोंडचा गोडवा हिरावला..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ पासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली.आजचा सोमवार व येत्या २४ ऑगस्ट,३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर पर्यंत चार...

सावधान..! ऑनलाईन गेमिंगचा नाद ठरू शकतो जीवघेणा.. – गेमिंगमध्ये पैसे गमावल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या तरुणाने घेतला गळफास..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-आजच्या घडीला जवळपास ९९ टक्के लोकांकडे स्मार्टफोन असल्याने यातील अनेकजण चालता-बोलता कनेक्ट होण्यासह पैसे कमावण्याचे मार्ग शोधतांना दिसून येतात.त्यातच,काहीजण पैसे कमाविण्याचा सोपा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!