- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथील बौद्ध समाज बांधवांच्या पुढाकारातून प्रेमी जोडप्यांचा विवाह आज,सोमवार १३ जानेवारीला सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास गावकऱ्यांसमक्ष राहुल बौद्ध विहार या ठिकाणी पार पडला.ईश्वर रामटेके वय ३१ वर्षे रा.कोंढाळा,ता.देसाईगंज,जि.गडचिरोली असे वर मुलाचे नाव असून करीना वेलादी वय १९ वर्षे रा.बीडरी पो.बुर्गी ता.एटापल्ली जि.गडचिरोली असे तरुणीचे नाव आहे.
प्रेमी जोडप्याचे एकमेकांवर प्रेम होते.मात्र,मुलीच्या घरच्यांकडून विरोध होत असल्यामुळे त्यांनी आज,कोंढाळा येथील बौद्ध समाज बांधव कमिटीकडे लग्न लावून देण्यासाठी आग्रह धरला होता.दोघांच्याही कागदपत्रांची पूर्ण पूर्तता करून त्यांचे लग्न आज १३ जानेवारीला सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास राहुल बौद्ध विहारात लावून देण्यात आले.यावेळी राहुल बौद्ध समाजाचे अध्यक्ष शिशुपाल वालदे,सचिव गुरुदास बन्सोड,शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष पवन खोब्रागडे,उपसरपंच गजानन सेलोटे, आम्रपाली बौद्ध महिला मंडळ समाजाच्या अध्यक्षा पुष्पा धाकडे,
बौद्ध उपासक,उपासिका तथा गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- Advertisement -