उद्रेक न्युज वृत्त
कोंढाळा :- देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत आज २६ जानेवारी २०२३ रोजी ७४ वा प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रम सादरीकरणात चिमुकल्या विध्यार्थी-विद्यार्थिनींनी गावकऱ्यांची मने जिंकून गावकऱ्यांचा आनंद द्विगुणित केला.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सकाळच्या सुमारास शाळेतील ध्वजारोहणानंतर आंबेडकर चौकातील डॉ.बाबा साहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व जयघोष करण्यात आला.त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय व गावातील ध्वजारोहण करून ९ वाजेच्या सुमारास जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये विद्यार्थ्यांचे इंग्रजीतील संभाषण,देशभक्तीपर नृत्य,वृक्ष संवर्धन,कवायती,लेझीमचे सादरीकरण,डंबल्स सादरीकरण,फुग्यांचे कोंबडे बाजार व इतर कार्यक्रम सादर करून विद्यार्थी-विद्यार्थिनींनी गावकऱ्यांची मने जिंकली.

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोंढाळा नेहमीच विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा व त्यांच्यातील कलारुपी शिक्षण बाहेर पडावे यासाठी प्रयत्नशील कार्ये करीत असतात.शाळेतर्फे शाळा बाहेरची शाळा उपक्रम,फुलोरा उपक्रम,ई-लर्निंग व इतर उपक्रम उत्कृष्टरित्या राबविण्यात येत आहेत.
प्रजासत्ताक दिनी गावातील प्रतिष्ठित नागरिक, गावकरी मोठ्या संख्येने एकत्र येऊन ध्वजारोहणास उपस्थित होते.ध्वजारोहण व शाळेतील कार्यक्रमाप्रसंगी ग्रामपंचायतीच्या सरपंचा अपर्णा नितीन राऊत,उपसरपंच गजानन सेलोटे,वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष नितीन राऊत,तंटामुक्ती अध्यक्ष हरिभाऊ पत्रे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शेषराव नागमोती,माजी सरपंच कैलास राणे,पोलीस पाटील किरणताई कुंभलवार,सामाजिक कार्यकर्ते अरुण कुंभलवार,तंटामुक्त समिती उपाध्यक्ष भाऊराव पत्रे,माजी अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती राजेंद्र शेंडे,राजेश मेश्राम,सुनील पारधी,पंढरी नखाते,माजी सरपंचा मंगलाताई शेंडे, ग्रामपंचायतीतील सर्व सदस्य गण,शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य गण,शाळेतील मुख्याध्यापक अनिल मूलकलवार,शिक्षक संतोष टेंभूर्णे,लालचंद धाबेकर,सुरेश आदे,शिक्षिका माधुरी रामगुंडे,रेखा चौधरी,रजनी जांभुळकर,शिल्पा सातेवार,भिमाताई ठवरे,निरुपारा देशपांडे,ग्रामपंचायत कर्मचारी, गावकरी,सामाजिक कार्यकर्ते व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
