Monday, July 27, 2026
Homeकोंढाळाकोंढाळा ग्रामपंचायततर्फे "मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान" अंतर्गत विविध उपक्रम.. - अतिरिक्त मुख्य...

कोंढाळा ग्रामपंचायततर्फे “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” अंतर्गत विविध उपक्रम.. – अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून उपक्रमांची पाहणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोंढाळा(गडचिरोली):-राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” या महत्वाकांक्षी अभियानाच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतला आहे.यामध्ये जिल्हा परिषद,पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींना त्यांच्या कामगिरीनुसार प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढविणे,त्यांना स्पर्धात्मक वातावरणातून नवीन उर्जा देणे,शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे,योजनांचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे व त्यातून ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावणे या उद्देशाने ही योजना तयार करण्यात आली आहे. त्याचबरोबर,ग्रामपंचायतींमध्ये लोकसहभागाची चळवळ निर्माण करणे,ग्रामीण नागरिकांना सुलभ रीतीने सेवा देणे,आरोग्य,शिक्षण,उपजीविका,सामाजिक न्याय या क्षेत्रांमध्ये ग्रामपंचायतींचा सहभाग वाढविणे,यासाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून राज्यात सर्वत्र “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” राबविण्यात येत आहे.या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा ग्रामपंचायततर्फे “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” अंतर्गत गावामध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.त्या अनुषंगाने गुरुवार १८ डिसेंबरला गडचिरोली जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार,उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक बानाईत, देसाईगंज पंचायत समिती गट विकास अधिकारी रविंद्र भाबड,पंचायत विस्तार अधिकारी लाडे,कृषी विस्तार अधिकारी श्रीरामे यांनी भेट देत ग्रामपंचायत कोंढाळा अंतर्गत सुरू असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातील विविध उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी करून स्तुस्ती सुमने उधळली.यात गावातील सार्वजनिक वाचनालय,आरोग्य उपकेंद्र,पशु वैद्यकीय दवाखाना, मशरूम प्लांट,तेल घाणी,रोपवाटिका,जिल्हा परिषद शाळा,अंगणवाडी,उमेद अंतर्गत विविध प्रकारचे उत्पादने तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ महिला बचत गट यांच्या दुध डेअरी आणि गावातील हिरकणी मसाले यांची पाहणी केली.प्रसंगी दहा टक्के निधी अंतर्गत महिला व बालकल्याण मधून उमेदला रेकार्डसाठी एक कपाट देण्यात आले.वनव्यवस्थापन समिती कोंढाळा यांच्या वतीने गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तसेच लोकमान्य टिळक विद्यालय कोंढाळा येथील मुलींकरीता सॅनेटरी पॅड देण्यात आले.राज्यातील विशेष काम करणाऱ्या ग्रामपंचायतींची माहिती देऊन आपली कोंढाळा ग्रामपंचायत राज्य स्तरावर नक्कीच पोहोचेल, असा आशावाद जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रसंगी गावातील निराधार महिलांनी कोंढाळा ग्रामपंचायतीच्या सरपंचा अपर्णा नितीन राऊत यांना सावित्रीबाई फुले व ज्योतीबा फुले यांची प्रतिमा देऊन त्यांच्या कामगिरी बद्दल आभार व्यक्त केला.प्रसंगी पाहुण्यांचे स्वागत करण्याकरीता गावातील ग्रामस्थ, पदाधिकारी,प्रतिष्ठित नागरिक यांनी उपस्थिती दर्शविली होती.मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानासाठी ग्रामपंचायतीच्या सरपंचा अपर्णा  राऊत,उपसरपंच गजानन सेलोटे,माजी महिला व बाल कल्याण सभापती गडचिरोली रोशनी पारधी,ग्रामपंचायत सदस्य संदिप वाघाडे,गोकुल ठाकरे,शेशराव नागमोती,प्रफुल मेश्राम, सदस्या शिल्पा चौधरी,नलिता वालदे,प्रतिभा राऊत, भुमेश्वरी गुरनुले, कल्पणा झिलपे,पोलीस पाटील किरण कुंभलवार,तंटामुक्त समिती अध्यक्ष हरिभाऊ पत्रे,वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष नितीन राऊत,शाळा व्यवस्थापन समिती सुनिल पारधी,माजी सरपंच कैलास राणे,गावातील आजि-माजी पदाधिकारी तसेच मान्यवर महिला व युवकांनी सहभाग नोंदवून उपक्रम उत्साहात पार पाडला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत १७ प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून युवकांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि उद्योगक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे.उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण घेतल्यास...

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने...

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

तरुणाईचा धसका..! पेपरफुटीवर कठोरता आणण्यासाठी आज सादर होणार परीक्षा सुधारणा विधेयक..

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून देशभरातील विद्यार्थ्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासोबतच राष्ट्रीय परीक्षा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!