Saturday, May 2, 2026
Homeदेसाईगंजकोंढाळाच्या शालेय विद्यार्थ्यांना झाले टीम इंडियाच्या खेळाडूंचे दर्शन.. - विद्यार्थ्यांनी घेतला सहलीचा...

कोंढाळाच्या शालेय विद्यार्थ्यांना झाले टीम इंडियाच्या खेळाडूंचे दर्शन.. – विद्यार्थ्यांनी घेतला सहलीचा आनंद..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या वतीने काल शनिवारी नागपूरच्या विविध भागातील प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी सहलीचे आयोजन करण्यात आले होते.त्यानुसार,सकाळच्या सुमारास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील पारधी यांनी सहलीचे आनंद घेण्यासाठी निघालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.शाळेतर्फे एसटी महामंडळच्या तब्बल ६ बसेस करण्यात आल्या होत्या.यात शाळेतील ३०० च्या वर विद्यार्थी तसेच शिक्षकवृंद सहभागी झाले होते. दरम्यान,नागपुरात पोहचल्यानंतर विद्यार्थ्यांना दीक्षाभूमी, मंदिरे,उद्यान तसेच विमानतळ दाखविण्यात आले. अश्यातच विमानतळ पाहत असतांनाच योगायोगाने विद्यार्थ्यांना टीम इंडियाच्या खेळाडूंचे दर्शन झाले.विशेष म्हणजे,भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना येत्या, बुधवार २१ जानेवारी रोजी जामठा येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या(व्हीसीए)स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.या महत्त्वपूर्ण सामन्यासाठी भारतीय टी-२० संघातील बहुतांश खेळाडूंचे काल शनिवारी संध्याकाळी वेगवेगळ्या विमानांनी नागपूर विमानतळावर आगमन झाले.रवी बिश्नोई,रिंकू सिंग, ईशान किशन आणि संजू सॅमसन यांचे संध्याकाळी सहा ते साडे सहाच्या दरम्यान आगमन झाले.त्यानंतर रात्री ८.४० ते ९.४० च्या दरम्यान तरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह,अक्षर पटेल,हार्दिक पंड्या,सूर्यकुमार यादव,अभिषेक शर्मा आणि शिवम दुबे यांची विमाने नागपुरात उतरली.त्याचवेळेस,कोंढाळा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे संपूर्ण शालेय विद्यार्थी विमाने पाहण्यासाठी विमानतळावर उपस्थित होते.प्रसंगी अनेक विद्यार्थ्यांना खेळाडूंचे दर्शन झाल्याने विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला.सर्व खेळाडूंना कडेकोट पोलिस बंदोबस्तात हॉटेल रॅडिसन ब्ल्यू येथे नेण्यात आले.दरम्यान,आपल्या आवडत्या खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींनीही नागपूर विमानतळापासून हॉटेलपर्यंत मोठी गर्दी केली होती.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!