Monday, September 7, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तकैद्यांना मद्य पार्टीसाठी 'व्हीआयपी' सेवा देणे भोवले.. - तब्बल ११ पोलीस कर्मचारी...

कैद्यांना मद्य पार्टीसाठी ‘व्हीआयपी’ सेवा देणे भोवले.. – तब्बल ११ पोलीस कर्मचारी निलंबित तर दोन पोलिसांना घरचा रस्ता..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-सात कैद्यांची तब्बेत बरी वाटत नसल्याने पोलिसांनी त्यांना औषधोपचारासाठी रुग्णालयात नेले.रुग्णालयात तर नेले मात्र,काही कैद्यांना रुग्णालयातून चक्क मद्य पार्टीसाठी तसेच हॉटेलात जेवणासाठी आणि मौजमजेसाठी नेत ‘व्हीआयपी’ सेवा पुरविल्याची बाब पोलीस तपासात उघड झाल्याने पोलिस आयुक्तांनी तब्बल ११ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले,तर दोन पोलिसांना घरचा रस्ता दाखवत शासकीय सेवेतून बडतर्फ केले आहे.विशेष म्हणजे, पहिल्या टप्प्यात नऊ जण तर दुसऱ्या टप्प्यात दोघेजण निलंबित करण्यात आले आहे.सदरची घटना ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील असून ४ ऑगस्ट २०२५ रोजी ठाणे कारागृहातील सात कैद्यांना औषधोपचारासाठी ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयात गंगाराम घुले यांच्यासह नऊ पोलिसांद्वारे नेण्यात आले.औषधोपचार झाल्यानंतर फसवणुकीतील गुन्हेगार रमेशभाई पांबर आणि करण ढबालीया यांना चक्क एका रिक्षातून बाहेर मद्य पार्टीसाठी करून हॉटेलात जेवणासाठी आणि मौजमजेसाठी नेल्यात आले. सदरची बाब शहरात वाऱ्यासारखी पसरताच पोलिसांच्या भूमिकेवर टीकेची झोड उठविण्यात आली.पोलिसांच्या भूमिकेवर टीकेची झोड उठताच ठाणे पोलिस मुख्यालयामधील गंगाराम घुले यांच्यासह नऊ पोलिस कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले.त्यानंतर ठाणे शहर मुख्यालयाचे पोलिस उपायुक्त डॉ.पवन बनसोड यांच्याकडे तपास देण्यात आला.तपासात गुन्हेगारांना ‘व्हीआयपी’ सेवा पुरविल्याची बाब उघड होताच परत शिवाजी गर्जे आणि दत्तात्रय जाधव या दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर दुसऱ्या टप्प्यात निलंबनाची कारवाई करण्यात आली.तर गुन्हेगारांना हॉटेलात मद्य पार्टीसाठी जाण्यास मोकळीक देणाऱ्या ठाणे शहर मुख्यालयातील पोलिस हवालदार गिरीश पाटील आणि पोलिस हवालदार योगेश शेळके यांना पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी शासकीय सेवेतून बडतर्फ केले आहे.सदरची कारवाई पोलिस आयुक्तांनी शुक्रवारी केली.गुन्हेगारांना अश्याप्रकारे पोलिसांनीच सहकार्य करणे,हे अशोभनीय असून समाजात पोलिसांची प्रतिमा मलिन होऊन पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असतो.गुन्हेगारांना सहकार्य करणारे सेवेत असणे म्हणजे विवक्षित कृत्यांना आणखी बढावा देणे आहे,असे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी स्पष्ट केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मध्यरात्री तरुणाचा धारदार शस्त्राने खून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २५ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना नागपूर शहराच्या सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आमदार निवासस्थानाजवळील एका गल्लीत मध्यरात्रीच्या...

सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या सणावर महागाईचे सावट..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकरी बांधवांच्या सुख-दुःखात वर्षभर खांद्याला-खांदा लावून राबणाऱ्या सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा बैलपोळा सण अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे.मात्र,यंदा पोळ्याच्या उत्साहावर...

मॉन्सूनचा प्रभाव कमी; आजपासून सूर्य आग ओकण्याच्या तयारीत..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-काही दिवसांपूर्वी विदर्भात सक्रिय असलेला मान्सून परतीच्या मार्गावर असल्याने आज,सोमवार ७ सप्टेंबरपासून सूर्य आग ओकून तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता प्रादेशिक...

माजी सरपंचांनाच प्रशासक म्हणून कायम ठेवण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींवर तत्कालीन सरपंच हे प्रशासक म्हणून नेमण्यात आले होते.अश्यातच माजी सरपंचांच्या सहा महिन्यांच्या काही प्रशासक पदाची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!