उद्रेक न्युज वृत्त
कुरूड :- विद्यार्थ्यांच्या दहावी बोर्डाची परीक्षा आज २ मार्च पासून सुरू झाली आहे.यानिमित्ताने देसाईगंज तालुक्यातील कुरुड ग्रामपंचयतीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद हायस्कूल शाळेच्या कुरुड परीक्षा केंद्रास भेट देऊन शाळेतील शिक्षकांशी संवाद साधून दहावी बोर्डाच्या परीक्षेस विद्यार्थी उपस्थिती संख्या,गैरहजर संख्या,पिण्याच्या पाण्याची सोय,कॉपी मुक्त अभियान व इतर बाबीं विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.
तालुक्यातील कुरुड दहावी परीक्षा केंद्रामध्ये जिल्हा परिषद हायस्कूल शाळा कुरुड,राधेश्याम बाब विद्यालय कुरुड,विद्या निकेतन लोकमान्य टिळक विद्यालय कोंढाळा व रेणुकाबाई उके विद्यालय शिवराजपुर या चारही विद्यालयातील विद्यार्थी दहावी बोर्डाच्या परीक्षेला बसले आहेत.कुरूड ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी दरम्यान १५३ विद्यार्थी परीक्षा देत असून १ विद्यार्थी गैरहजर असल्याचा आढळून आला.शाळेतील विद्यार्थ्यांना पाण्याची सोय व इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून शासनाच्या आदेशानुसार शाळेत कॉपी मुक्त अभियान राबविण्यात येत असल्याचे शिक्षक संवादादरम्यान पदाधिाऱ्यांना माहिती देण्यात आली.
दहावी परीक्षा केंद्रास भेटी दरम्यान उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.सदर परीक्षा केंद्रास भेटी प्रसंगी कुरुड ग्रामपंचायतीच्या सरपंचा प्रशाला गेडाम,उपसरपंच क्षितिज उके,ग्रामपंचायत सदस्य अविनाश गेडाम,सदस्या आशाताई मिसार,अविनाश राघोर्ते व ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते.