उद्रेक न्युज वृत्त
कुरुड :- देसाईगंज तालुक्यातील कुरुड येथे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा कुरुडच्या वतीने आज २३ जानेवारी २०२३ ला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून प्राथमिक आरोग्य केंद्र कुरुड येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले व बाळासाहेबांच्या नावाचा जयघोष करून अभिवादन कण्यात आले आहे.
जयंतीनिमित्ताने सर्व शिवसैनिक एकत्र येऊन बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनमनावर प्रकाश टाकण्यात आला.त्यांनी केलेले कार्य अतुलनीय असून न विसरण्यासारखे असल्याचे गडचिरोली शिवसेना उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम यांनी म्हटले आहे.त्यानंतर सर्व शिवसैनिकांनी जयघोष करून जयंतीचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला.
जयंती प्रसंगी अविनाश गेडाम शिवसेना उपजिल्हा प्रमुख गड.,दिगांबर मेश्राम मा.जी.प सदस्य गड,विलास ठाकरे विभाग प्रमुख शिवसेना,वंदनाताई रामटेके माजी.जी.प सदस्या गडचिरोली,प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ. शेडमेक,विठ्ठल ढोरे माजी ताप्र प्रमुख,दशरथ पिलारे,माजी ता.प्र.डॉ मनोज बुद्धे,कुणाल ठाकरे शिवसैनिक,घनश्याम केळझरकर,अखिल मैंद,बाळू गुरुनुले,गिरीधर ठाकरे औषध निर्माण अधिकारी,दत्तात्रय निमजे प्रयोगशाळा अधिकारी, आरोग्य केंद्रातील सिस्टर्स,नर्सेस,शेकडो शिवसैनिक व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी वर्ग उपस्थित होते.