उद्रेक न्युज वृत्त
मुख्य संपादक/सत्यवान रामटेके
कुरुड(देसाईगंज/गडचिरोली) :- देसाईगंज तालुक्याच्या कुरुड गावातील प्रतीक विनय घोडेस्वार वय २८ वर्षे रा.कुरुड,ता.देसाईगंज येथील रहिवासी असलेल्या तरुणाच्या डोक्यावर अवजाराणे वा हत्याराने प्रहार करून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या अज्ञात इसमांचा बेत फलित ठरीत असल्याची चर्चा दबक्या आवाजात गावामध्ये सुरू असून गेल्या पाच दिवसांचा कालावधी लोटूनही देसाईगंज पोलीस प्रशासनाच्या हाती कुठलाही पुरावा लागला नसल्याने ‘आम्ही करू ती पूर्व दिशा’ अशी मारेकऱ्यांची मनधारणा झाली तर असावी ना..? यासाठी पोलीस प्रशासन action मोडवर येणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.
सविस्तर वृत्त असे की,देसाईगंज तालुक्याच्या कुरुड गावामध्ये दिनांक-८ फेब्रुवारी २०२४ रोजी शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते.त्यानुसार गावामध्ये पाच मोफत तसेच दोन तिकिटांच्या नाटकाचे आयोजन गावातील मंडळातर्फे करण्यात आले होते.दिवसा शंकर पट व रात्रौ नाटकांचे प्रयोग असल्याने सर्वच जण आपापल्या धुंदीत असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.अशातच प्राप्त माहितीनुसार,अंधाराचा फायदा घेत प्रतीक घोडेस्वार याच्यावर अज्ञात व्यक्तींनी प्रहार करून त्याला संपविण्याचा कट पूर्वीच रचला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.कारण की,प्रतीक विनय घोडेस्वार हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत गावातील शंकर पटाच्या दुसऱ्या दिवशी पहाटे अंदाजे तीन ते चार वाजेच्या सुमारास घरा नजिक आढळून आला.त्यानुसार शासकीय रुग्णालय तसेच नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र तीन दिवसांनंतर उपचारा दरम्यान प्राणज्योत मावळली.महत्वाचे म्हणजे याची साधी भनक कुणालाही लागली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.अशातच पोलीस प्रशासनाने प्रकरणाचा उलगडा करण्यास सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता घटनेच्या दिवशी परिसरातील कुणाचे मोबाईल क्रमांक त्या घटनास्थळी active होते; तसेच मारेकरी कोण? याचा उलगडा करणे आवश्यक आहे.मात्र तसे न करता उगेचच कुणालाही नाहक त्रास देत असल्याचे अनेकांकडून बोलले जात आहे.सदर प्रकरण अतिशय गंभीर स्वरूपाचे असून अज्ञात मारेकरी सापडले गेले नाही तर परत पुन्हा त्यांची हिम्मत वाढतच जाणार व आम्ही करू ती पूर्व दिशा याची तयारी करणार असल्याने यावर कुठेतरी आळा घातला जाऊन; अज्ञात मारेकरी यांना पकडण्यात यावे; अशी मागणी सर्व सामान्य नागरिकांकडून केली जात आहे.