उद्रेक न्युज वृत्त
कुरुड :-देसाईगंज तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या कुरुड ग्रामपंचायतीचे उपसरपंच तथा देसाईगंज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष क्षितिज उके यांनी ग्रामपंचायतीमध्ये निवडून आल्यानंतर पाच वर्षात मिळणारे संपूर्ण मानधन शासनास परत दिले असल्याने गावातच नव्हे तर संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात एक नवा आदर्श ठेवला आहे.
जिल्ह्यात २०२१ मध्ये ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या; कुरुड ग्रामपंचायतीमध्ये क्षितीज उके यांनी पहिल्यांदाच आपले पॅनल तयार करून निवडणूक लढविली होती.निवडणुकांचा निकाल जाहीर होताच उके यांच्या पॅनलने बहुमत सिद्ध करून ग्रामपंचायतीमध्ये सत्ता काबीज केली.कुरुड ग्रामपंचायतीच्या तब्बल२५ वर्षाच्या कालावधीनंतर पहिल्यांदाच परिवर्तन घडून आले.देसाईगंज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तथा कुरुड ग्रामपंचायतीचे (हल्ली ) कार्यरत असणारे क्षितीज उके यांनी जनतेला दिलेली आश्वासने,जनसामान्यांचे प्रश्न,मन मिळावू स्वभाव,सर्वांना समजून घेणारे, विकासात्मक भूमिका घेणारे असे व्यक्तिमत्त्व असल्याने जनतेचा कौल मोठ्या प्रमाणावर गावातच नव्हे तर तालुक्यातही दिसून येतो.सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांना खोटे बोलणे वा ऐकून घेणे अजिबात आवडत नाही.
निवडून आल्यानंतर क्षितीज उके यांनी ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या पहिल्याच मासिक सभेत सर्वांसमोर पत्राद्वारे लिहून दिले की मला पाच वर्षात शासनाकडून ग्रामपंचायत अंतर्गत मिळणारे भत्ते,मानधन सर्व शासनास देत आहे.निवडणुकीचे तीन वर्षे लोटण्यास येत असूनही याबाबतीत गावातील नागरिकांना वा इतरत्र कुठेही त्यांनी कळू दिले नाही व तशी माहितीही होऊ दिली नाही.मात्र गुपितरीत्या माहिती घेतली असता सदर बाब निदर्शनास आली असल्याने क्षितीज उके यांचा नवा आदर्श दिसून येतो.