Wednesday, August 26, 2026
Homeकुरखेडाकुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी करण्यात आली.
शहरातील सर्व मुस्लिम बांधवांनी सकाळच्या सुमारास जामा मस्जिद कुरखेडा येथे एकत्र येत येथून मुस्लिम समाजाचे पवित्र स्थळ मक्का मदिनाच्या देखाव्यासह भव्य मिरवणूक काढली.यावेळी ‘अल्लाह हो अकबर’ व विविध धार्मिक नारेबाजी तसेच पैगंबरांचे गुणगान करीत मिरवणूक आझाद चौक,आंबेडकर चौक,मुख्य बाजारपेठ,जूना बसस्थानक,हनूमान मंदिर,कूंभीटोला रोड मार्गे पून्हा जामा मस्जिद कूरखेडा येथे पोहचली. दरम्यान ठिकठिकाणी ईद मिलादून्नबी कमेटीच्या वतीने बालकांना मिठाईचे वाटप करण्यात आले.तर सागर चौकात महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.यानंतर मस्जिद परीसरात धार्मिक ध्वजारोहण ज्येष्ठ सदस्य सईद अहेमद शेख यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी नुकतेच पवित्र हज यात्रा करून परत आलेले फैजान शेख यांचा कमेटीच्या वतीने शाल व पुष्पगूच्छ देत सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन उसमान खान,तर पैगंबर स्तूती गाण शादाब खान यांनी केले.तर कार्यक्रमाची सांगता जामा मस्जिदचे इमाम दिलशाद अहेमद यांनी देश व समाजात सौहार्द,सूख,समृध्दी नांदण्याकरीता सामुहिक प्रार्थना केली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता ईद मिलादून्नबी कमेटीचे अध्यक्ष न्याज सय्यद,उपाध्यक्ष तौकीर शेख,सचिव कासीद कुरेशी,सदस्य फाजील शेख,सरफराज शेख,नावेद शेख,रेहान शेख,मिजान शेख,हूसैन शेख,आसिफ शेख,शहेबाज शेख,जमीर शेख, जमील शेख यांच्यासह सर्व समाज बांधवांनी सहकार्य केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आरोग्य सेवक व वरिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्हा हिवताप कार्यालयातील आरोग्य सेवक व वरिष्ठ लिपिकाने नक्षल प्रोत्साहन भत्त्याचे एरियस बिल काढण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी गोंदियाच्या लाच लुचपत प्रतिबंधक...

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण-२०२६(Special Intensive Revision-SIR)कार्यक्रमात सुधारणा केली असून,सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.त्यानुसार,येत्या ३१ ऑगस्ट २०२६...

राज्यातील सर्व शासकिय,खाजगी व धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिटसह संबंधित यंत्रणांचे ऑडिट करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देतांना रुग्णालयांची सुरक्षा प्राधान्याची बाब आहे.राज्यातील सर्व शासकीय,खासगी व धर्मदाय आरोग्य संस्थांमधील...

५ टक्के दिव्यांग कल्याण निधीचा शंभर टक्के विनियोग करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश.. – नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर दिव्यांग कल्याणासाठी राखीव निधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवावा. प्रलंबित UDID नोंदणी व वैद्यकीय तपासणी प्रक्रिया...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!