- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(गडचिरोली):-दोन दिवसांपूर्वी कुरखेडा शहराच्या एका जनरल स्टोर्समध्ये मध्यरात्रीच्या सुमारास दुकानातून ३ लाखाची रोकड लंपास केल्या प्रकरणी कुरखेडा पोलिसांनी दुकानात काम करणाऱ्या एका मदतनीस बालकासह अन्य तिघांना अटक करीत मुद्देमाल जप्त केला आहे.
कुरखेडा शहरातील जनरल स्टोर्सचे संचालक साहील हिरालाल वरलानी यांचे शहरातील मुख्य मार्गावर किराणा व इतर सामानांचे होलसेलचे दुकान आहे.दोन दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास दुकानात चोरी झाल्याप्रकरणी त्यांनी कुरखेडा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती.तक्रारीत दुकानातील ३ लाख रुपयांची रोकड चोरी झाल्याचे नमूद करण्यात आले.त्यानुसार कुरखेडा पोलिसांनी अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल केला.अशातच दुकानात काम करणारा मदतनीस बालक याच्या वर्तवणुकीत बदल दिसून येऊ लागल्याने शंका बळावली.त्यानुसार पोलिसांनी काम करणाऱ्या मदतनीसाची झडती घेत चौकशी केली.चौकशी अंती त्याने गुन्ह्याची कबुली दिली.कबूली वरून त्याचे सहकारी पुन्हा २ विधीसंघर्षग्रस्त बालक व एक आरोपी नामे इब्राहिम इसराइल कुरेशी वय २० वर्षे रा.कुरखेडा यांना ताब्यात घेण्यात आले.गून्हाची कबूली देताच त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या रोख ३ लाख रकमेपैकी २ लाख ८८ हजार ६९९ रुपये हस्तगत करण्यात आले व आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता २०२४ कलम ३३१(३)३३१(४)३०५(अ),३(५) अन्वये गून्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस अधिक्षक निलोत्पल,अप्पर पोलीस अधिक्षक एम.रमेश, उपविभागीय पोलीस अधिकारी रविन्द्र भोसले यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार महेन्द्र वाघ,पोलीस उपनिरीक्षक वर्षा बोरसे,पोलीस हवालदार शेखलाल मडावी,संदेश भैसारे यांच्या टीमने केला.
- Advertisement -