- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-नुकतेच चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वाढत्या पाणीटंचाईवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या वैनगंगा नदी पात्रात ५ एप्रिल २०२५ रोजी भर उन्हात काँग्रेस पक्षाच्या वतीने पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी तीव्र ठिय्या आंदोलन केले होते.सदरचे आंदोलन हे भंडारा जिल्ह्याच्या गोसेखुर्द धरणातून वैनगंगा नदी पात्रात तातडीने पाणी सोडण्याच्या मागणीसाठी करण्यात आले होते.सदरच्या आंदोलनास यश आल्याचे दिसून येत आहे.अखेर आज,शनिवार १२ एप्रिल रोजी गोसीखुर्द धरणातून वैनगंगा नदीपात्रात ४० कुमेक्सने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला असून नदीकाठच्या गावांतील नागरिक,शेतकरी व मत्स्यव्यावसायिक यांना गडचिरोली आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.वैनगंगा नदीकिनारी असलेले देसाईगंज(वडसा), आरमोरी व चामोर्शी तालुक्यांतील सर्व गावांमध्ये तलाठी व कोतवाल यांच्या माध्यमातून नागरिकांना सावध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.नदीपात्रात शेती करणारे शेतकरी,मासेमारी करणारे,नदीकिनारी पाणी पिण्यासाठी गुरे नेणारे नागरिक तसेच पूल,रस्ते बांधकाम करणाऱ्या नागरिकांनी
खबरदारी घ्यावी,असेही आवाहन करण्यात आले आहे.
- Advertisement -