Sunday, July 19, 2026
Homeनागपूरकचऱ्याचा डाला अंगावर पडून एकाचा मृत्यू..!

कचऱ्याचा डाला अंगावर पडून एकाचा मृत्यू..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-महानगरपालिकेच्या कचरा संकलनासाठी वापरल्या जाणाऱ्या घंटा गाडीवर काम करत असतांना कचऱ्याचा संपूर्ण डाला अचानक अंगावर कोसळल्याने एका कंत्राटी सफाई कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,रविवार १८ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास नागपूरच्या सक्करदरा परिसरात घडली.सिद्धू ऊर्फ सिद्धार्थ घोडके वय ३९ वर्षे,रा.अजनी परिसर असे मृत कामगाराचे नाव असून ए.जी.एन्व्हिरो प्रा.लि.या खासगी कंपनीकडून चालवण्यात येणाऱ्या कचरा गाडीवर सफाई कामगार म्हणून कार्यरत होते.
सिद्धू घोडके हे आज रविवारी सकाळच्या सुमारास नागपूर महानगरपालिकेच्या नेहरू नगर झोन अंतर्गत  बुधवार बाजार परिसरात कर्तव्यावर होते.कचरा उचलण्याचे काम सुरू असतांना गाडीच्या हायड्रोलिक प्रणालीत बिघाड झाल्याने कचऱ्याचा डाला अचानक सुटला आणि थेट सिद्धार्थ यांच्या अंगावर कोसळला. यात त्यांच्या डोक्याला जबर मार बसला आणि ते कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले.घटना घडताच सहकाऱ्यांनी तात्काळ त्यांना बाहेर काढून मेडिकल कॉलेजच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केले.मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेने सफाई कामगारांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली.घटनेनंतर संतप्त कामगार,संघटना आणि मृताच्या नातेवाईकांनी सक्करदरा पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले.मृत्यूला कंपनीचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याने ए.जी.एन्व्हिरो प्रा.लि.विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व मृताच्या कुटुंबाला तात्काळ २५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी आणि पत्नीला नोकरी देण्यात यावी, अशी ठोस मागणी आंदोलकांनी लावून धरली होती. सिद्धार्थ घोडके यांच्या पश्चात आई,पत्नी आणि दोन अल्पवयीन मुली असा परिवार आहे.कुटुंबाचा एकमेव आधारवड गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पोलिसांनी पकडले सुगंधीत तंबाखूचे मोठे १० पोते..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-सध्याच्या घडीला राज्याच्या विविध भागात अवैध सुगंधित तंबाखू,गुटखा व इतर मादक पदार्थ विक्री तथा त्याची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईचा सपाटा सुरू असतांनाच...

शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना विविध अर्थसहाय्य योजनांचा लाभ; प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान,कोलकाता यांच्या समान निधी(Matching Schemes)व असमान निधी(Non-Matching Schemes)योजनांद्वारे राज्यातील शासनमान्य...

रेल्वेची धडक; सहा हरणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या पारशीवनी तालुक्यातील कन्हान नगर परिषद हद्दीच्या तुकाराम नगर नजीकच्या रेल्वे स्टेशन परिसरातील ट्रॅकवर तब्बल सहा हरीण मृतावस्थेत आढळून आल्याची घटना आज,शनिवार...

नैनपूरच्या महात्मा गांधी नगर परिषद शाळेत दोन डिजिटल वर्गखोल्यांचे उद्घाटन; प्रत्यक्ष मतदानातून शालेय मंत्रिमंडळाची स्थापना..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या नैनपूर वार्ड येथील महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेत डिजिटल शिक्षण आणि लोकशाही मूल्यांचा सुंदर संगम अनुभवत आज,शनिवार १८...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!