Thursday, September 10, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तमग महाराष्ट्रात EVM मशीनचा हट्ट का? जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका...

मग महाराष्ट्रात EVM मशीनचा हट्ट का? जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या.. – नाना पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष तथा साकोली(भंडारा) विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यांना पत्र लिहून राज्यातील राजकारणावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांनी महाराष्ट्रातील निवडणूक व्यवस्थेचा बुरखा पूर्णतः फाटलेला आहे.शहरी भागात झालेली अत्यल्प मतदानाची टक्केवारी ही केवळ “मतदार उदासीनता” नसून,निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कमी होत असल्याचे निदर्शक आहे.
मतदार यादीतील घोळ,मतदान केंद्र शोधण्यासाठी मतदारांना दोन-तीन तास वणवण,आणि अखेरीस हजारो नागरिकांना मतदान न करता परत जावे लागणे.या साऱ्या बाबी निवडणूक आयोगाच्या अकार्यक्षमतेचे गंभीर निदर्शक आहेत.ही परिस्थिती लोकशाहीसाठी घातक असून,तिची जबाबदारी कोण घेणार,हा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे.
अत्यंत गंभीर बाब म्हणजे,या निवडणुकांमध्ये VVPAT प्रणालीचा वापर करण्यात आलेला नव्हता.त्यामुळे मतदाराला आपल्या मताची खात्री करण्याचा अधिकारच हिरावून घेण्यात आला.त्यात भर म्हणजे,मतदारांच्या बोटावर लावलेली शाई हात धुतल्यानंतर सहज निघून जात असल्याचे शेकडो व्हिडीओ आणि प्रत्यक्ष उदाहरणे प्रसारमाध्यमांतून समोर आली.या साऱ्या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता,विश्वासार्हता आणि आयोगाची निष्पक्षता यावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
देशातील अनेक राज्यांनी जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी आणि वाद टाळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याचा निर्णय घेतलेला आहे.मग महाराष्ट्रात EVM मशीनचा हट्ट का?कोणाच्या फायद्यासाठी ही सक्ती? हा प्रश्न आज सामान्य मतदार विचारत आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती या ग्रामीण लोकशाहीच्या कणा आहेत.या निवडणुकांबाबत जर संशय,अविश्वास आणि गैरव्यवस्थेचे वातावरण राहिले, तर त्याचे गंभीर परिणाम राज्याच्या लोकशाही आरोग्यावर होतील.त्यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका बॅलेट पेपरद्वारेच घेण्यात याव्यात,ही जनभावना आहे.या जनभावनेचा आदर करून आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात.असे नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप..!

उद्रेक न्युज वृत्त :-युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने उद्या,शुक्रवार ११ सप्टेंबर रोजी एक दिवसीय देशव्यापी संपाची हाक दिली...

राज्यस्तरीय ज्युनियर ‘कुंग फू’ स्पर्धेत वांगेपल्ली शाळेच्या मोहनला कांस्यपदक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पुणे येथे पार पडलेल्या २४ व्या राज्यस्तरीय 'ज्युनियर वुशू स्पर्धा-२०२६' मध्ये अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली येथील शासकीय निवासी शाळेचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी...

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये...

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!