Thursday, July 16, 2026
Homeनागपूरकंपनीतील स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना मिळणार प्रत्येकी ८२ लाख रुपये..

कंपनीतील स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना मिळणार प्रत्येकी ८२ लाख रुपये..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील राऊळगाव जवळील एसबीएल कंपनीत काल,रविवार १ मार्च रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण स्फोटात कंपनीत काम करणाऱ्या तब्बल १९ कामगारांचा मृत्यू झाला आहे.तर अद्याप २३ जण जखमी असून यात १३ जण ७० टक्के भाजल्याने गंभीर जखमी आहेत.अश्यातच आज,सोमवार २ मार्च रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीदरम्यान नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कंपनीतील स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना मदतीची घोषणा केली आहे.यात मृतांच्या वारसांना कंपनीकडून ७५ लाख रुपये,राज्य सरकारकडून ५ लाख रुपये तर केंद्र सरकारकडून २ लाख रुपये असे एकूण ८२ लाख रुपये मदत दिली जाईल.तर जखमींना २५ लाख रुपये दिले जाणार आहेत.याशिवाय जखमींच्या पुनर्वसनासाठी विशेष योजना आखून पुनर्वसन केले जाईल.त्यातच,जोपर्यंत एसबीएल कंपनी जोपर्यंत बंद राहील तोपर्यंत कामगारांना वेतन देण्यात येईल.कंपनी परत सुरू झाल्यानंतर त्यांना कौशल्य विकासाबाबत प्रशिक्षण देण्यात येईल.घटनेतील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई  केली जाईल,असे बावनकुळे यांनी आज झालेल्या बैठकीत स्पष्ट केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिला पोलीस उपनिरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.. – ३ लाख रुपये घेतांना रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात गुन्हा 'बी' फायनल करण्यासाठी मदत केली व पुढे भविष्यातही अशीच मदत करण्यासाठी ८ लाख रुपयांची मागणी करून...

आज २२ मिनी सेतू केंद्रांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण.. दुर्गम भागात लोकाभिमुख डिजिटल प्रशासनाला नवी दिशा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई/गडचिरोली :-गडचिरोलीत नक्षलवादाचा प्रभाव कमी झाल्यानंतर आता प्रशासनाची जबाबदारी अधिक वाढली असून दुर्गम भागातील नागरिकांना केवळ प्रशासनाची उपस्थिती नव्हे,तर प्रशासनाचा लोकाभिमुख चेहरा...

वनहक्क पट्टेधारकांसाठी मोठा निर्णय; शेतकरी म्हणून मिळणार स्वतंत्र ओळख.. – विविध योजनांचाही मिळणार लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-वनहक्क पट्टेधारकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.वनहक्क कायद्यांतर्गत पात्र ठरलेल्या अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासींना आता सुधारित सातबारा मिळणार असल्याने...

गडचिरोली जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा; शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.. – खताची जादा दराने विक्री केल्यास करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता व घाबरून न...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!