उद्रेक न्युज वृत्त
नवी दिल्ली :- औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला केंद्र सराकरने मंजुरी दिली आहे.यापुढे औरंगाबादचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’ तर उस्मानाबादचे नाव ‘धाराशिव’ असे असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे फडणवीस यांनी आभार मानले आहेत.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकारने ‘करुन दाखविले’, असेही फडणवीस यांनी म्हटले.
दरम्यान,२९ जून २०२२ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने औरंगाबादचे संभाजीनगर,उस्मानाबादचे धाराशिव करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ४ जुलै २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रिमंडळाने महाविकास आघाडी सरकारने केलेल नामांतराचा ठराव रद्द केला.त्यानंतर १६ जुलै २०२२ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर या प्रस्तावाला पुन्हा एकदा मंजुरी दिली आहे.
औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे होणार नामकरण…
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक


सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES