उद्रेक न्युज वृत्त
औंगाबाद :-ऐन थंडीत पडणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. औरंगाबाद आणि जालन्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
मराठवाड्यातील जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने तडाखा दिला. अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे उन्हाळी ज्वारी, मका, गहू आडवा झाला तर रबीतील हरभरासह इतर पिकांचे नुकसान झाले.