Tuesday, October 6, 2026
Homeऔरंगाबादमोठी बातमी,परीक्षेचा पेपर फुटण्यावर बसणार आळा; प्रश्नपत्रिका वितरणाचा १० मिनिटे अगोदरचा निर्णय...

मोठी बातमी,परीक्षेचा पेपर फुटण्यावर बसणार आळा; प्रश्नपत्रिका वितरणाचा १० मिनिटे अगोदरचा निर्णय रद्द…- २१ फेब्रुवारी बारावी तर २ मार्च दहावीच्या लेखी परीक्षेस होणार सुरुवात

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

औरंगाबाद :- समाज माध्यमावर होणाऱ्या पेपर फुटीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी आणि कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडण्यासाठी आता परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या हाती वितरित करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेपासून रद्द करण्यात येत आहे.अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओेक यांनी दिलेल्या पत्रात दिली आहे.माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी तर दहावीची लेखी परीक्षा २ मार्च पासून घेण्यात येणार आहे. या परीक्षांचे आयोजन कॉपीमुक्त वातारवणात होण्यासाठी राज्य मंडळाच्या वतीने शुक्रवारी बैठक घेण्यात आली.यावेळी ही माहिती ओक यांनी दिली.दहावी-बारावी हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्यामुळे पालक आणि समाज घटक या परीक्षांकडे लक्ष देवून असतात.विद्यार्थ्यांचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका पाच सहा वर्षापासूनदेण्यात येत होती. परंतु प्रश्नपत्रिका मोबाईलवर तसेच समाज माध्यमातून व्हायरल झाल्याचे प्रकार, अफवा अशा घटनाही परीक्षेच्या काळात निदर्शनास आलेल्या आहेत. त्यामुळे पेपरफुटीच्या अशा अफवांमुळे परीक्षार्थींचे नुकसान होते, त्यांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. पेपरफुटीच्या घटनांना आळा बसावा, परीक्षा निकोप, भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडाव्यात यासाठी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरित करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेपासून रद्द करण्यात येत आहे असे ओक यांनी म्हटले आहे.कॉपीमुक्त परीक्षेसाठी भरारी पथकांशिवाय बैठे पथके, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधिकक्षक, मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या समन्वयातूनही भरारी पथक नियुक्त करण्यात येणार आहेत

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नितेश कराळे मास्तरांनी नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भरला उमेदवारी अर्ज..

उद्रेक न्युज वृत्त :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक,सामाजिक कार्यकर्ते तथा विदर्भातील वऱ्हाडी भाषेत स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करणारे शिक्षक म्हणून प्रसिद्ध असलेले कराळे मास्तर अर्थात नितेश...

मतदार यादी पुनरीक्षण; आता बीएलओ घरी जाऊन स्वीकारणार नोटीस प्राप्त मतदारांची कागदपत्रे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जुळवणी न झालेल्या किंवा जुळवणीत तार्किक विसंगती असलेल्या मतदारांना सुनावणीची नोटीस प्राप्त झाली असली,तरी निवडणूक...

बँकांनी कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांना तगादा लावून नये; जीवाचे बरे वाईट केल्यास यंत्रणेला जबाबदार धरले जाईल- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने सरकारकडून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना पीक कर्जवसुलीपासून दिलासा देण्यात आला आहे.अश्यातच काही बँका,पतसंस्था वा इतर वित्तसंस्था शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी...

लोखंडी पाईपांच्या आड गांजाची तस्करी; तिघांना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-लोखंडी पाईपांच्या आड लपवून आणलेला तब्बल ५०० किलो गांजाचा साठा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने(एनसीबी)नागपुरात जप्त केला.हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील स्कायलाइन ढाब्याजवळ पहाटेच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!