Sunday, May 31, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तएसटीच्या तिकीट दरात हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय..

एसटीच्या तिकीट दरात हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने अर्थात एसटी प्रशासनाने तिकीट दरात हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.सदरची वाढ ही येत्या, मंगळवार १४ एप्रिलच्या मध्यरात्रीनंतर लागू होणार आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटी महामंडळाला सणासुदीच्या आणि गर्दीच्या काळात ३० टक्क्यांपर्यंत भाडेवाढ करण्यास मंजुरी दिली आहे.मात्र,यंदाच्या उन्हाळी हंगामासाठी दहा टक्के भाडेवाढ लागू करण्यात आली आहे.बसस्थानके,बसगाड्या आणि आगार स्वच्छ ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याने प्रत्येक तिकिटावर २ रुपये स्वच्छता अधिभार आकारला जाणार आहे.महिला सन्मान योजना,ज्येष्ठ नागरिक आणि इतर सवलतधारक प्रवाशांनाही हा स्वच्छता अधिभार लागू असेल.त्यामुळे सर्व प्रवाशांवर या वाढीचा परिणाम होणार आहे. ‘आवडेल तिथे प्रवास’ योजनेअंतर्गत चार आणि सात दिवसांच्या पासवर ५ रुपये अधिभार आकारला जाणार आहे.मात्र,आगाऊ आरक्षणातून घेतलेल्या पासवर हा अधिभार लागू नसेल.तसेच बस भाड्याने घेणाऱ्यांना प्रति बस ५० रुपये अधिभार द्यावा लागणार आहे.अश्यातच काही महत्त्वाच्या मार्गावरील नवे तिकिट दर- मुंबई ते पुणे-२८२ वरून ३१४ रुपये तिकीट दर,मुंबई ते नाशिक-३२३ वरून ३५९ रुपये, मुंबई ते कोल्हापूर-७५० वरून आता ८२५ रुपये,
परळ ते कोल्हापूर-६४० वरून ७०४ रुपये,मुंबई ते चिपळूण- ४५३ वरून ५०२ रुपये,मुंबई ते लातूर – ९०० वरून १००० रुपये,मुंबई ते रत्नागिरी- ६०० वरून ७०० रुपये तिकीट दर तर मुंबई ते अलिबाग- १८२ ऐवजी २०४ रुपये.ही भाडेवाढ साधी बस,मिडी बस,जलद सेवा आणि रात्रसेवा देणाऱ्या गाड्यांसाठी लागू असेल.मात्र शिवनेरी,शिवशाही,जनशिवनेरी, हिरकणी,शयनयान आणि ई-बस सेवांना या दार वाढीतून वगळण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तरुणाने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-एका ३६ वर्षीय विवाहित तरुणाने राहत्या घरीच गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची घटना आज,रविवार ३१ मे रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा शहरातील...

विवाहित महिलेचा गळा चिरून हत्या करणारा आरोपी अटकेत.. – क्षुल्लकशा कारणावरून हत्या; बालपणापासून होते प्रेमप्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या धोपटाळा कामगार वसाहतीत एका विवाहित महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून निघृण हत्या करण्यात आल्याची थरारक घटना शुक्रवार...

धानोरा व एटापल्ली तालुक्यात २० हजार धुररहित चुलींचे वितरण.. -दरवर्षी ४१ हजार टनांहून अधिक जळाऊ लाकडाची होणार बचत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शन व पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा व एटापल्ली या दुर्गम,आदिवासी तालुक्यांमध्ये राबविण्यात आलेल्या धुररहित चुल उपक्रमाला उल्लेखनीय...

चार दिवसांत उष्माघाताचे तब्बल १८ जण बळी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या नवतपाचे दिवस सुरू आहेत.२५ मे २०२६ पासून सुरू झालेली सूर्याची दाहकता २ जून २०२६ पर्यंत राहणार आहे.अश्यातच भयंकर तापणाऱ्या नवतप्याने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!