Tuesday, March 25, 2025
Homeदेसाईगंजएवढे फास्ट काम करू नका; जिल्ह्यात तुमचा नाव गाजतोय....! -देसाईगंज तालुक्यातील शासकीय...
spot_img

एवढे फास्ट काम करू नका; जिल्ह्यात तुमचा नाव गाजतोय….! -देसाईगंज तालुक्यातील शासकीय कर्मचाऱ्याने कार्यतत्पर कर्मचाऱ्यास ठणकावले….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :- तालुक्यात एक अनोखा व आश्चर्यजनक प्रकार उघडकीस आला असून चक्क एका विभागातील शासकीय कर्मचाऱ्याने त्याच विभागातील कार्यतत्पर कर्मचाऱ्यास ‘एवढे फास्ट काम करू नका’ कारण जिल्ह्यात काम करण्यामध्ये वरिष्ठांकडे तुमचा नाव गाजत आहे.आम्ही हळूहळू काम करतो तुम्ही सुद्धा हळूहळू काम करा..! अन्यथा तुम्हाला एखाद्या प्रकरणात दाबू.अशी धमकीवजा बोलणी एका कार्यतत्पर कर्मचाऱ्याला दिली असल्याने सगळीकडे चर्चेचा विषय ठरला आहे.

एका संबंधित विभागातील कर्मचाऱ्याने नाव उघड न करता नाव गुपीत ठेवले जात असेल या शर्तीच्या अधीन राहून माहिती दिली आहे.सर्वसामान्य नागरिकांची कामे व कार्यालयीन कामकाजामध्ये सदैव कार्यतत्पर असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यास त्याच विभागातील वेगवेगळ्या ठिकाणी एकाच पदावर कार्यरत असणारे तीन ते चार शासकीय कर्मचारी मिळून मानसिक त्रास देत असल्याने देसाईगंज तालुक्यातून बदली करण्याच्या मार्गावर असल्याची माहिती दिली आहे.

कार्यतत्पर कर्मचारी वरिष्ठांनी सांगितलेली कामे वेळेत पूर्ण करणे,कार्यालयीन कामकाज व्यवस्थितरीत्या पार पाडणे,नागरिकांना उत्कृष्ट सेवा देने,सुट्टीच्या दिवसांतही अपूर्ण असलेली कामे पूर्ण करणे,तक्रारी वा गाऱ्हाणी येऊ न देणे व इतर अशी अनेक कार्ये उत्कृष्टरित्या पार पाडीत असल्याने तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारीही वाहवाही करतात.मात्र याला अपवाद म्हणून काही कर्मचारी पाय ओढण्याचे कामे करतांना सर्व प्रकारणांवरून दिसून येत आहे.कार्यतत्पर कर्मचारी यांनी दिलेल्या माहितीनुसार वरिष्ठांकडे पाय खिचणाऱ्यांची नावे सांगीतली तर माझी फसवणूक करू शकतात.या भीतीने वरिष्ठांकडेही तक्रार करू शकत नसल्याचे सांगितले आहे.

Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेती तस्करांच्या मागे धावला वाघ; ट्रॅक्टरच्या ट्रालीत उडी घेतल्याने थोडक्यात बचावले मजूर..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :- 'रेती चोरीचा मामला अन् हळूहळू बोंबला' अश्या कथानक रेती तस्कर रंगवू लागले आहेत.रात्र असो की दिवस,चोरांसाठी सारखेच असतात. अशातच चंद्रपूर जिल्ह्याच्या...

खासदारांचे वेतन वाढ; २४ टक्के वाढ झाल्याने आता महिन्याकाठी ‘इतका’ मिळणार पगार..

उद्रेक न्युज वृत्त :-संसदीय कामकाज मंत्रालयाने आज,सोमवारी २४ मार्च रोजी अधिसूचना जारी करीत खासदारांच्या वेतनात २४ टक्के वाढ केली आहे.सदरचे वाढीव वेतन हे १...

पेट्रोलियम ऑईल कंपनीमध्ये आगीचा भडका..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-शहराच्या औद्योगिक विकास महामंडळ वसाहतीत(MIDC) आज,सोमवार २४ मार्चला दुपारच्या सुमारास अचानकपणे आगीचा भडका उडाल्याने परिसरात एकच खळबळ माजली.उन कडक असल्याने आगीने रौद्ररूप...

गोंडी धर्मशक्ती सल्ला गांगरा शक्ती स्थापना व समाजप्रबोधन कार्यक्रम संपन्न… -सध्याची जनसुनावणी ही लोकशाहीला हरताळ फासणारी -प्रा.अनिल होळी

उद्रेक न्युज वृत्त  विशेष प्रतिनिधी/प्रियंका ठाकरे गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील गहूबोडी येथे काल,रविवार २३ मार्चला ‘गोंडी धर्मशक्ती सल्ला गांगरा’ स्थापना आणि समाजप्रबोधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.सदर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!