Tuesday, September 22, 2026
Homeनागपूरएमडी ड्रग्स पावडर,घातक शस्त्रे तसेच चोरीचा संशय असलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह तिघांना अटक..

एमडी ड्रग्स पावडर,घातक शस्त्रे तसेच चोरीचा संशय असलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह तिघांना अटक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-पोलीस गस्तीदरम्यान सार्वजनिक ठिकाणी  काही संशयास्पद व्यक्तींना ताब्यात घेताच मोठा भांडाफोड होऊन कारवाईत एमडी(मेफेड्रोन)पावडर, घातक शस्त्रे तसेच चोरीचा संशय असलेले सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण सुमारे १६ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी आकाश राजू हतागडे वय ३७ वर्षे,रा.विश्वास नगर,योगेश संजू सीरिया वय ३० वर्षे,रा.गवळीपुरा,सदर आणि आकाश गजानन टाले वय ३० वर्षे,रा.मानव सेवा नगर,नागपूर यांना अटक करण्यात आली आहे.पोलीस तपासादरम्यान,आकाश हतागडे याने एमडी पावडर योगेश सीरियाकडून खरेदी करून ती आकाश टालेला देणार असल्याची माहिती समोर आली आहे.योगेश सीरिया याने ही एमडी पावडर आकाश कटारिया उर्फ अक्कूकडून घेतल्याचे निष्पन्न झाल्याने,पोलीस त्याचा शोध घेत आहेत.सदरची कारवाई ही नागपूर शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी (एनडीपीएस)पथकाने गिट्टीखदान पोलिस ठाणे हद्दीतील विश्वास नगर परिसरात केली.
मंगळवारच्या मध्यरात्री ते सकाळच्या सुमारास
दाऊद पान सेंटरजवळील सार्वजनिक रस्त्यावर गस्तीदरम्यान काही संशयास्पद व्यक्तींना अंमली पदार्थ विरोधी(एनडीपीएस)पथकाने ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे १६ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन)पावडर आढळून आली.या आरोपींच्या घरांची झडती घेतली असता,सत्तूर,तलवार यांसारखी शस्त्रे तसेच चोरीचा संशय असलेले ८८.२०० ग्रॅम सोन्याचे आणि ८७६.८०० ग्रॅम चांदीचे दागिने जप्त करण्यात आले.दरम्यान,तीन आरोपींना अटक करण्यात आली असून,एका फरार आरोपीचा शोध सुरू आहे.या प्रकरणी आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायदा कलम ८(क),२२(ब),२९,भारतीय हत्यार कायदा कलम ४ व २५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे.अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.राज्यात पावसाने घेतलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!