Friday, May 29, 2026
Homeगडचिरोलीएटापल्लीचा मशरूम प्रकल्प जोमात..

एटापल्लीचा मशरूम प्रकल्प जोमात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील मशरूम उत्पादन प्रकल्पाबाबत “प्रकल्प बंद”असल्याच्या अफवांना पूर्णविराम देत,हा प्रकल्प नियोजनबद्ध आणि पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.उलट,पहिल्याच टप्प्यात यशस्वी उत्पादन घेत या प्रकल्पाने बाजारपेठेत ठोस ओळख निर्माण केली असून, पुढील उत्पादन टप्प्यासाठी सज्ज झाला आहे.
मशरूम उत्पादन ही अत्यंत संवेदनशील आणि वैज्ञानिक पद्धतीने केली जाणारी शेती असून,नियमित तांत्रिक प्रक्रियेनुसार पुढील बॅचसाठी तयारी सुरू आहे.उत्पादन कक्षांचे निर्जंतुकीकरण,नवीन सबस्ट्रेट व स्पॉनची तयारी तसेच तापमान व आर्द्रतेचे व्यवस्थापन यांसारख्या प्रक्रिया राबविण्यात येत असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.त्यामुळे प्रकल्प बंद असल्याचे समजणे चुकीचे असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
या प्रकल्पामुळे एटापल्ली परिसरातील महिला बचत गटांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला असून, त्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होत आहे.दुर्गम भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा हा प्रभावी नमुना ठरत आहे.स्थानिक स्तरावर उत्पादित मशरूमला बाजारपेठेत उत्स्फूर्त व सकारात्मक प्रतिसाद मिळत असून,ग्राहकांमध्ये त्याची मागणी वाढत आहे.दरम्यान, मशरूम उत्पादक महिला बचत गटांनीही प्रकल्पाबाबत समाधान व्यक्त केले आहे. महिला सरस्वती बचत गटाच्या सदस्यांनी सांगितले की, “मशरूम विक्रीसाठी कोणतीही अडचण नसून आम्ही समाधानी आहोत.”
संताजी महिला बचत गटाने नमूद केले की, “गावात एकूण सहा मशरूम उत्पादक गट कार्यरत आहेत. आम्ही मशरूम उत्पादनाचे प्रशिक्षण घेतले असून उत्पादन सुरळीतपणे सुरू आहे.” तसेच इतर मशरूम उत्पादक बचत गटांच्या सदस्यांनी सांगितले की, “मशरूम उत्पादन व्यवस्थित सुरू आहे.शासनाकडून सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आमची कोणतीही तक्रार नाही.” या पार्श्वभूमीवर महिला बचत गटांच्या सदस्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, “आमच्या एटापल्लीतील ताज्या व गुणवत्तापूर्ण मशरूमला ग्राहकांनी प्राधान्य द्यावे.स्थानिक उत्पादनाला साथ दिल्यास आमच्या उपजीविकेला मोठा आधार मिळेल.” नागरिकांनी या नाविन्यपूर्ण मशरूम उत्पादन उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आंघोळीसाठी गेलेल्या तीन जणांचा नदीत बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आंघोळीसाठी गेलेल्या तीन जणांचा वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील शेडगाव येथील वणा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज, शुक्रवार २९ मे रोजी...

कुरुडच्या बोडेगाव रेती घाटात अवैध उत्खनन जोमात; देसाईगंज महसूल विभाग कोमात..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शासनाने रेतीघाट लिलाव केलेय खरी,पण अवैधरित्या वाळूची चोरी करणाऱ्या चोरट्यांपेक्षा काही रेतीघाटधारकच महाचोरटे असल्याचा प्रकार आज,शुक्रवार २९ मे रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या...

अत्यंत कठीण परिस्थितीतही आम्ही प्रामाणिकपणे आरोग्य सेवा दिली; मात्र आता मानधनाशिवाय सेवा देणे अशक्य झाले आहे.. – पेसा बहुद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांचा कामबंद आंदोलनाचा...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष)पेसा पदभरतीमधील मानधनावर कार्यरत कर्मचाऱ्यांनी शासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत बिनपगारी कामबंद आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला...

साध्या मीटरच्या जागी स्मार्ट मीटर लावण्याचा सपाटा.. – तुमच्या परवानगीशिवाय मिटर बदलताच येत नाही..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात वीज वितरण कंपनीने मागील काही महिन्यांपासून साध्या मीटरच्या जागी स्मार्ट मीटर लावण्याचा सपाटा सुरू केला आहे.मात्र,वीज वितरण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!