उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :- आपण बघितले असेल की चित्रपट कलाकारांचे फॅन आगळेवेगळे असतात.आपल्या शरीरावर टॅटू काढणे,त्यांचा चेहरा हुबेहूब तयार करून चर्चेस आणणे व कलाकारांना भेटण्यासाठी कितीतरी मैलांचा प्रवास केल्याच्या घटना आपण बघितल्या असाल.परंतु एखाद्या चाहतीने आपल्या आवडत्या कलाकाराच्या नावे कोट्यवधी रुपयांची संपत्ती दान केले असल्याची पहिलीच घटना आहे.
मुंबईतील मलबार हिल परिसरात राहणाऱ्या निशा पाटील यांनी २०१८ मध्ये संजय दत्तला फोन करून सांगितला की माझी संपूर्ण संपत्ती तुमच्या नावे केली.संजय दत्तला सुरुवातीला आश्चर्यच वाटले.नंतर संजय दत्तनी निशा पाटील यांच्या बँकेच्या लॉकर मध्ये ठेवलेल्या संपत्तीची चौकशी केली असता दागिन्यांसह ७२ कोटी रुपये संजय दत्तच्या नावाने केले होते.१५ जानेवारी २०१८ रोजी यांचा दीर्घ आजाराने मृत्यू झाला.
निशा पाटील यांच्या अंत्य विधीनंतर कुटुंबासमोर मृत्यू पत्राचे वाचन केल्यानंतर ही बाब समोर आली.नंतर संजय दत्तने निशा पाटील यांनी नावे केलेली सर्व मालमत्ता त्यांच्या जवळच्या कुटुंबीयांकडे हस्तांतरित होईल याची काळजी घेतली.