- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या एकलपूर येथे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते आज,मंगळवार ८ एप्रिलला नवीन १० लक्ष रुपयांच्या रस्ता बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.प्रसंगी आमदार मसराम म्हणाले की, “ग्रामीण भागात रस्ते,वीज,पाणी या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हेच आमचे ध्येय असून एकलपूरमधील या रस्त्याच्या कामामुळे नागरिकांचा प्रवास सुलभ होईल आणि देवस्थान परिसरात येणाऱ्या भाविकांनाही नक्कीच मोठा फायदा होईल.” सदर नवा रस्ता बांधकाम हे आमदार यांच्या स्थानिक विकास निधीतून असून एकलपूर येथील अंतोबा देवस्थान मंदिर परिसर ते ग्रामपंचायत परिसरात आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते आज भूमिपूजन संपन्न झाले.
सदर रस्ता बांधकामाचे भूमिपूजन करतेवेळी एकलपूर उपसरपंच विजय शहारे,ग्रामपंचायत सदस्य ज्ञानदेव पिलारे,देवानंद सयाम,ग्रामसेवक रवींद्र मेश्राम,विलास बन्सोड,सागर वाढई,चंदू दुपारे,ज्ञानेश्वर कुळमेथे,अरुण भागडकर,मनोज कोडवते,गोपाल भागडकर,राम मैंद,देवराव दुपारे,प्रमोद ठेंगरी,कालिदास भागडकर, हेमराज तूपटे,विवेक तूपटे,युवराज पिलारे,रामू उईके यांचेसह स्थानिक पदाधिकारी तथा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या कामाला मंजुरी देऊन बांधकामास तात्काळ निधी उपलब्ध करून दिल्याने ग्रामस्थांनी आमदार मसराम यांचे आभार मानले आहे.
- Advertisement -