- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-राज्यात महायुतीची सरकार आल्याने सर्वत्र मोठ्या प्रमाणावर महायुतीचे नेते,पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकत्र येत आनंदोत्सव साजरा केला. अशातच हल्ली सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री कोण? यासाठी आटापिटा सुरू झाला आहे.त्यातच शिवसेना(शिंदे गट)च्या गडचिरोली संपर्कप्रमुख वर्षाताई मोरे यांचेसह महिला पदाधिकाऱ्यांनी मुंबईच्या ठाणे येथील मंदिरास भेट देत परत एकदा राज्याच्या मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची वर्णी लागावी; यासाठी आई अंबाबाईकडे साकडे घातले आहे.सोबतच गडचिरोलीच्या महिला पदाधिकारी, जिल्हाप्रमुख पोर्णिमा ईस्टाम,जिल्हाप्रमुख अर्चनाताई गोंधळे,उपजिल्हाप्रमुख संगीता हर्षे यांनी महायुतीच्या विजयाबद्दल मिठाई वाटप करून जल्लोष साजरा केला.
वर्षाताई मोरे यांनी निवडणुकीपूर्वी महिला पदाधिकाऱ्यांसह वविध योजनांची माहिती पोहचविण्यासाठी ‘डोअर टू डोअर’ भेटी दिल्या होत्या.त्यातच लाडकी बहिण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात मोलाची भूमिका बजावली होती.राज्यात सध्या स्थितीत लाडकी बहिण योजना ही गेमचेंजार ठरल्याचे म्हटले जात आहे.
- Advertisement -